शाहुपूरी पोलीसांची डॉल्बी मालकावर धडक कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सह्याद्री गणेश तरुण मंडळ, कर्तव्य ग्रुप गणेश तरुण मंडळ, अजिंक्यतारा गणेश मंडळांच्या गणेशमूर्ती आगमनावेळी वाजविण्यात आलेल्या डॉल्बी मालकावर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी डॉल्बी सिस्टीम आणि वाहन जप्त केले आहे.

शाहुपुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये गणपती आगमण सोहळयामध्ये मोठयाने डॉल्बी लावुन ध्वनी प्रदुषन अधिनियम 2000 चे उल्लंघन करणाऱ्या डॉल्बी मालकांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी शाहुपुरीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी दिल्या होत्या.

त्याप्रमाणे दि.01/09/2024 रोजी शाहुपुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये गणपती आगमन सोहळा मिरवणुकीत सह्याद्री गणेश तरुण मंडळ, कर्तव्य ग्रुप गणेश तरुण मंडळ, अजिंक्य तारा गणेश मंडळ या मंडळाचे समोर वाजविण्यात आलेल्या डॉल्बी चालकावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 सुधारीत 2012 प्रमाणे संबंधितावर मा. न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. तसेच दि.02/09/2024 रोजी भुई गल्ली तरुण मंडळ ढोणे कॉलनी सातारा यांचे गणपती आगमन सोहळा मिरवणुक राजवाडा ते देवी चौक अशी सार्वजनिक रोडवर मिरवणुक घेवुन जात असताना भुई गल्ली तरुण मंडळ यांनी पाटील प्लस साऊंड सिस्टीमचा टेम्पो (एमएच.11 एफ-3147) वर लावुन सार्वजनिक रोडवर मोठमोठयाने वाजवुन ध्वनी प्रदुषणाचे उल्लंघन केले.

शाहुपुरी पोलीस ठाणे चे बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर साऊंड सिस्टीमचा ध्वनी मापक यंत्राद्वारे मोजनी करुन सदर साऊंड सिस्टीम मालकावर ध्वनी प्रदुषन अधिनियम 2000 प्रमाणे योग्य ती कायदेशीर कार्यवाही करणेत आलेली आहे. तसेच टेम्पो एम. एच.11 एफ-3147 या वाहन मालकाने वाहनाचे चेसी व बॉडीमध्ये बेकायदेशीर बदल केला असल्याने सदरचे वाहन पुढील कारवाई कामी उप- प्रादेशीक परिवहन कार्यालयाकडे जमा करण्यात आले आहे.