अग्निशस्त्र जिवंत काडतुसे बाळगणाऱ्यास अटक; शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरणाची कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा येथील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने मंगळवार तळे परिसरातून एका‌ संशयितास अग्निशस्त्र बाळगल्या प्रकरणी मुद्देमालसह अटक केली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सातारा शहरामध्ये मंगळवार तळे परिसरात एक जण संशयितरीत्या फिरत असल्याची माहिती शाहुपुरी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने सापळा रचला. त्यावेळी संशयित त्याठिकाणी आला तेव्हा त्याला पकडून ताब्यात घेतले.

संशयिताचे नाव योगेश भिमराव देवकर (वय ३०) मंगळवार पेठ असे अटक करण्यात नाव आहे. त्याची झडझडती घेतली तेव्हा त्याच्याकडून अग्निशस्त्र व जिवंत काडतुसासह ६५,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक साबळे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, जोतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्नील सावंत, सुमित मोरे, सुनिल भोसले यांनी केली आहे.