सातारा जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या साडे सात लाख ‘बहिणी लाडक्या’!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी’ योजनेला सातारा जिल्ह्यात प्रतिसाद असून अर्जांची संख्या आठ लाखांजवळ पोहोचली आहे. तर साडेसात लाखांहून अधिक अर्जांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये कराड तालुक्यातील लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या १ लाख ४१ हजारांपर्यंत पोहोचली आहे. यामुळे जिल्ह्यात योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये येणार आहेत.

जून महिन्यात राज्य शासनाने अऱ्थसंकल्प जाहीर केला. यामध्ये ‘मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी’ योजना जाहीर करण्यात आली. यामध्ये पात्र महिलेला महिन्याला दीड हजार रुपये भेट देण्यात येणार आहे. या अंतर्गत अर्ज नोंदणी करण्यास सुरूवात केली. सातारा जिल्ह्यातही जिल्हा प्रशासनाने मोहीमेला गती दिली आहे. या मोहिमेत अंगणवाडी सेविकांना सामावून घेऊन गावपातळीवर शासकीय कर्मचाऱ्यांची समिती स्थापन केली. त्यामुळे या योजनेच्या नोंदणीला गती मिळाली आहे.