पिंपळोशी ग्रामपंचायतीवर पुन्हां एकदा राष्ट्रवादीचाच झेंडा!; पालकमंत्री शंभूराज देसाईंना मोठा धक्का

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । पिंपळोशी ग्रामपंचायतीवर पाटणकर गटाने पुन्हां एकदा राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला आहे. नाट्यमय राजकीय घडामोडींनतर पिंपळोशी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पाटणकर गटाच्या विशाल निकम यांची बहुमताने निवड करण्यात आली. या निवडीमुळे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

नवनिर्वाचित सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज पाटण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांची सदिच्छा भेट घेतली. नवनिर्वाचित सरपंच, सर्व सदस्य व प्रमुख पदाधिकाऱ्यांचे माजी मंत्री विक्रमसिंहजी पाटणकर व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांनी अभिनंदन केले.

यावेळी नुतन सरपंच श्री.विशाल निकम, सौ.मिलन सय्यद (सदस्या), सौ.तनुजा शेख(सदस्या), श्रीमती नंदाताई निकम(सदस्या), श्री.राजेंद्र राऊत (नगरसेवक, पाटण नगरपंचायत), आनंदा गणवे, नथुराम गणवे, संतोष चौधरी, दस्तगीर सय्यद, ईलाई सय्यद, सुरेश लांबोर, संपत गुजर, संपत निकम, अंकुश निकम, प्रदिप निकम, मारुती निकम, बाळकृष्ण निकम, सचिन निकम, अल्ताफ शेख व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपळोशी ता.पाटण या गावातील ग्रामपंचायतीवर सत्तास्थापनेपासून पाटणकर गटाचीच सत्ता होती. परंतु यावेळच्या पंचवार्षिक निवडणुकीत पाटणकर गटाने ४ व देसाई गटाने ३ जागांवर विजय मिळविला. काठावरची परिस्थिती निर्माण झाल्याने देसाई गटाने पाटणकर गटाच्या एका सदस्यास सरपंच पदाचे आमिष दाखवून आपल्या गटात सामील करून घेतले.

देसाई गटास बहुमत मिळाले व पहिल्यांदाच ग्रामपंचायतीवर त्यांनी सत्ता स्थापन केली. त्यानंतर देसाई गटाचे इतर सदस्य व सरपंच यांच्यामध्ये वांरवार खटके उडू लागले व सर्व सदस्यांनी त्यांच्यावर अविश्वास ठराव आणला. यानंतर सरपंच पदासाठी पुन्हां एकदा फेरमतदान घेण्यात आले. यावेळी पाटणकर गटाला बहुमत मिळाले व विशाल कदम हे सरपंच झाले. जे सदस्य देसाई गटात गेले होते त्यांनीही पाटणकर गटास पाठिंबा दिला.