सत्यजितसिंह पाटणकर हाच आपला पक्ष अन् उमेदवार; पाटणच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांचा निवडणूक लढवण्याचा निर्धार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | पाटण विधानसभा मतदारसंघात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून हर्षद कदम यांना उमेदवारी देण्यात आली. यानंतर नाराज असलेल्या शरदचंद्र पवार गटाचे नेते सत्यजित पाटणकर नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान पाटणकर यांनी आज कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन मते जाणली. यावेळी १९८३ मध्ये झालेल्या अन्यायानंतर पाटणच्या स्वाभिमानी जनतेने उठाव करून अक्षरशः वर्गणी गोळा करुन माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांना विजयी केले. त्याचीच पुनरावृत्ती आता २०२४ मध्येही करायची असे सांगत सत्यजितसिंह पाटणकर हाच आपला पक्ष अन् उमेदवार असा निर्धार कार्यकर्त्यांनी केला. इतकेच नाही तर यावेळी मेळाव्यात यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्‍चंद्र पवार पक्षाच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामेही सादर केले.

पाटण येथे सत्यजित पाटणकर गटाकडून कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर, माजी शिक्षण सभापती राजेश पवार, टाटाचे कामगार नेते सुजित पाटील, पंचायत समिती माजी सभापती राजाभाऊ शेलार, खरेदी विक्री संघ चेअरमन ॲड. अविनाश जानुगडे, तालुका दूध संघाचे चेअरमन सुभाषराव पवार आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.