सत्यजित पाटणकरांची भाजप राज्य परिषद सदस्यपदी नियुक्ती

0
562
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । खासदार शरद पवार गटाचे निष्ठावंत म्हणून मानले जाणारे सत्यजितसिंह पाटणकर यांनी भाजपचे कमळ हाती घेतले त्याला उद्या एक महिना पूर्ण होत आहे. त्यापूर्वीच भाजपकडून पाटणकरांची राज्य परिषद सदस्यपदी नियुक्ती करण्यात आले आहे. भाजपने पाटणकरांना पक्षात घेत त्यांची आता राज्यपरिषद सदस्यपदी नियुक्ती करून नाराज असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात बळ दिले आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पाटणकरांना सोबत घेऊन भाजप शंभूराज देसाई यांना चितपट करण्याचा डाव तर आखात नाही ना? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

भाजपकडून मंगळवारी रात्री राज्य परिषद सदस्यांची एक यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये तब्बल ४५४ जणांचा समावेश करण्यात आला आहे. सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव आहे. या यादीमध्ये राज्य परिषद सदस्य म्हणू सातारा जिल्ह्यातून खासदार उदयनराजे भोसले, माजी आमदार मदन भोसले, सत्यजित पाटणकर यांना २०२५ ते २०२८ या कार्यकालासाठी स्थान देण्यात आले आहे.

अवघ्या महिनाभरापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सत्यजित पाटणकर यांच्या भाजप राज्य परिषद सदस्यपदी करण्यात आलेल्या नियुक्तीमुळे पाटण तालुक्यात पाटणकर गटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सत्यजीत पाटणकर गटाकडे सध्या पाटण पंचायत समितीची एकहाती सत्ता आहे. सत्यजीत पाटणकर सातारा जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात आहेत. नव्याने स्थापन केलेल्या शुगेरकेन फॅक्टरीच्या माध्यमातून सत्यजीत मतदारसंघातील शेतकऱ्यांना देखील आकर्षित करण्याचा प्रयत्न करतायेत. त्यामुळे शेतकरी वर्ग व मूळचा पाटणकर गटातीळ कार्यकर्ते याला आता भाजपचे पाठबळ यामुळे सत्यजित पाटणकर यांना येणाऱ्या आगामी निवडणुका सहज जिंकणे शक्य होणार आहे.