सातारा जिल्ह्यात मोठ्या उद्योगांची गुंतवणूक वाढवण्यास प्रयत्न करणार : उदय सामंत

Satara News 42

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याकरिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक कार्यालय मंजूर केल्याबद्दल जिल्ह्यातील सर्व उद्योजक व मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) च्या पदाधिकाऱ्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेत त्यांचे आभार मानले. यावेळी सातारा जिल्ह्यातील उद्योजकांच्या नवीन प्रस्तावित औद्योगिक वसाहत, ग्रामपंचायत कर व मोठ्या उद्योगांची गुंतवणूक वाढावी यासाठी प्रयत्न करू. तसेच इतर प्रश्नाबाबत सातारा … Read more

झाडाणी प्रकरणी ‘या’ दिवशी होणार अंतिम सुनावणी; चंद्रकांत वळवींनी दिली कबुली

Satara News 39

सातारा प्रतिनिधी । सध्या राज्यात गाजत असलेल्या महाबळेश्वरमधील झाडाणी येथील तब्बल ६२० एकर जमीन व्यवहार प्रकरणी आज गुरुवारी अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्यासमोर पुन्हा सुनावणी पार पडली. यावेळी सुनावणीस गुजरातचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांनी स्वतः उपस्थिती लावली. त्यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांसमोर काही कागदपत्रे सादर केली तर उर्वरित कागदपत्रे सादर करण्यासाठी व म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागितली. … Read more

जिल्ह्यातील 87 ग्रामपंचायतीच्या इमारतीसाठी 17 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर

Satara News 20240711 084206 0000

सातारा प्रतिनिधी | राज्याच्या ग्रामविकास विभागाने बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेकरता सातारा जिल्ह्यातील 87 ग्रामपंचायतीच्या इमारत बांधकामास मंजुरी देण्यात आली आहे. या ग्रामपंचायतीच्या इमारतीसाठी 17 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी … Read more

साताऱ्यात पेन्शन अदालतीवर सेवानिवृत्तांचा बहिष्कार

Satara News 20240711 074813 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा पंचायत समितीमध्ये बुधवारी पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी सतीश बुध्दे यांनी अदालत सुरू झाल्यानंतर अवघ्या 10 मिनिटांमध्ये ‘माझा स्टाफ अकार्यक्षम’ असल्याचे कारण सांगून काढता पाय घेतला. यामुळे पेन्शन संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी या अदालतीवरच बहिष्कार टाकला. यामुळे कर्मचारी व पेन्शनधारकांमध्ये जोरदार वादावादी झाली. सातारा पंचायत समितीत बुधवारी सकाळी 10 वाजता … Read more

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेण्याचे सहायक आयुक्तांचे आवाहन

Satara News 20240709 090754 0000

सातारा प्रतिनिधी | राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणा-या दिव्यांगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहित्य साधणे, उपकरणे खरेदीसाठी तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्रद्वारे मानसिक स्वास्थ अबाधित ठेण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज … Read more

हवामान विभागाने सातारा जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची वर्तवली शक्यता

Satara News 20240709 073719 0000

सातारा प्रतिनिधी | जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस वाढत असून हवामान विभागाने आज दि. ९ जुलै रोजीपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार (रेड अलर्ट) पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानेही नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून पाऊस सुरू आहे. सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ८८६ मिलीमीटर पाऊस होतो. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ३११ मिलीमीटर पर्जन्यमान … Read more

ठोसेघर धबधब्याच्यास्थळी हुल्लडबाजी करणाऱ्यांना पोलिस प्रशासनाकडून कारवाईचा इशारा

Satara News 20240708 150737 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील ठोसेघर येथील धबधब्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलीस पहारा देण्यात आला आहे. पर्यटकांनी ठोसेघर धबधबा स्थळी संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि पोलीस यांनी घालून दिलेले नियम पाळावेत. मद्यप्राशन करून हुल्लडबाजी केल्यास संबंधित पर्यटकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीलेश तांबे यांनी दिला आहे. संयुक्त वन … Read more

सातारा-कास मार्गावर कुजलेला पालापाचोळा ठरतोय जीवघेणा; पावसाळ्यात दुचाकींचे घसरून अपघात

Kas Road News 20240708 125734 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा-कास मार्गावर काही ठिकाणी दुतर्फा झाडांचा पाला पडून पावसाच्या पाण्याने तो कुजल्याने घसरण निर्माण होत आहे. त्यामुळे परिसरात पर्यटनास येणाऱ्या पर्यटकांनी आपली वाहने जपून चालवणे आवश्यक आहे. पाल्यावरून दुचाकीस्वार भरधाव वेगाने जात असताना दुचाकी घरून अपघात होत आहेत. सातारा शहराच्या पश्चिमेस देश-विदेशात आपल्या विविधरंगी व दुर्मीळ फुलांच्या सौंदर्याची ख्याती पोहोचवणारे तसेच आंतरराष्ट्रीय … Read more

टोलवसुली विरोधात उंब्रजमधील नागरिक आक्रमक; एकत्रितपणे देणार निवेदन

Umbraj News 20240707 104414 0000

कराड प्रतिनिधी | तासवडे, ता. कराड येथील टोलनाक्यावर स्थानिकांच्या वाहनांकडून घेण्यात येणारा टोल त्वरित थांबवण्यात यावा, यासाठी उंब्रज परिसरातील नागरिक आक्रमक झाले आहेत. टोलनाका व्यवस्थापनाला ग्रामपंचायत व नागरिकांच्यावतीने आज, दि. 7 रोजी सकाळी 11:30 वाजता निवेदन देण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सरपंच योगराज जाधव यांनी केले आहे. तासवडे टोलनाक्यावर स्थानिकांच्या वाहनांना … Read more

जोरदार पावसामुळे कास तलाव ओसंडला; पर्यटकांची गर्दी, तलावाच्या भिंतीवरून वाहू लागले पाणी

Satara News 20240707 100540 0000

सातारा प्रतिनिधी | पावसाचा जोर वाढल्यामुळे सातारा शहरातील काही भागाची तहान भागवणारा कास तलाव शनिवारी ओसंडून वाहू लागला. कास तलावाच्या भिंतीवरून पाणी वाहू लागले असून तलावात आता ०.००५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे. यामुळे वर्षभराचा पाण्याचा प्रश्न आता मिटला आहे. तलाव परिसरातील निसर्गरम्य वातावरणामुळे तलाव परिसराकडे पर्यटकही गदीं कर लागले आहेत. कास तलावाची १२.४२ मीटर … Read more

माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी किसन वीर साखर कारखान्याकडून पाण्याचा टँकरची सोय

Satara News 20240707 071356 0000

सातारा प्रतिनिधी | संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या उदात्त हेतूने किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील व्यवस्थापनाने वारकऱ्यांच्या सेवार्थ पिण्याच्या पाण्याच्या टँकरची सोय केलेली आहे. या पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे पुजन किसन वीर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत … Read more

बंदीवासात वाढलेले 10 जटायू पक्षी निसर्गात स्वतंत्रपणे घेणार गगन भरारी

Satara News 20240706 144059 0000

सातारा प्रतिनिधी | पुराणात जटायु गिधाडांचा उल्लेख आहे. रामायणामध्ये याच जटायु पक्षाने सीता मातेला लंकापती रावणापासून वाचविण्यासाठी आपले प्राण पणाला लावल्याचा उल्लेख आहे. पारसी समाजामध्ये प्रेतांना दफन करण्यापेक्षा निसर्गातिल गिधाडांना खावू देण्याची प्रथा होती. पण गिधाडेच नामशेष होवू लागल्याने ती मोडीत निघाली. अशात बॉम्बे नेचरल हिस्ट्री सोसायटीच्या शास्त्रज्ञांच्या गेल्या तीन दशकातील प्रयत्नांना आता यश येताना … Read more