संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी धावणार 108 बसेस

Satara news 20240701 072637 0000

सातारा प्रतिनिधी | श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आगमन सातारा जिल्ह्यात दि. ६ जुलै रोजी होत आहे. दि. ६ ते ११ जुलैअखेर पालखी सोहळा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार असल्यामुळे पालखी सोहळ्यात वारकरी व भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी महामंडळाचा सातारा विभाग सज्ज झाला आहे. सुमारे १०८ जादा बसेस उपलब्ध करण्यात आल्या असून या बसेस विविध … Read more

‘हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर स्थानक’ अभियानात फलटण आगाराचा प्रथम क्रमांक

Phalatan News 20240629 110021 0000

सातारा प्रतिनिधी | ‘हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर स्थानक’ अभियानात फलटण आगाराचा पुणे प्रदेश स्तरावर प्रथम क्रमांक आला आहे. या अभियानात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल बसस्थानकास बक्षीस म्हणून १० लाख रुपये मिळाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष यांच्या संकल्पनेतून १ मे २०२३ ते ३० एप्रिल २०२४ या कालावधीमध्ये एसटी महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर ‘हिंदूहृदयसम्राट … Read more

फलटणसह बारामती रेल्वे प्रकल्प भूमिपूजनास रेल्वेमंत्री वैष्णव उपस्थित राहणार

Phalatan News 20240629 100145 0000

सातारा प्रतिनिधी | पंचक्रोशीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेल्या बारामती फलटण रेल्वे मार्गाचे काम पूर्णत्वास येत आहे. तब्बल 1850 कोटी रुपयांच्या या संपूर्ण प्रकल्पाच्या भूमिपूजन येणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. नवी दिल्ली येथे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रेल्वे मंत्री ना. अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती. त्यावेळी रेल्वेमंत्री ना. अश्विनी … Read more

निंबुतमधील गोळीबारातील गंभीर जखमी रणजीत निंबाळकर यांचा उपचारा दरम्यान मृत्यू

Crime News 20240629 084350 0000

सातारा प्रतिनिधी | बारामती तालुक्यातील निंबुत येथे शर्यतीच्या बैलावरून झालेल्या गोळीबारामध्ये गंभीर जखमी झालेले फलटण तालुक्यातील तावडी येथील रणजीत निंबाळकर यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युमुळे फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. गत 2 दिवसांपूर्वी बारामती तालुक्यातील निंबुत येथे एक गोळीबाराची घटना घडली होती. यामध्ये फलटण तालुक्यातील तावडी येथील रणजीत निंबाळकर हे गंभीर जखमी झाले … Read more

महा-अवास योजना अभियान ग्रामीण 2.00 अंतर्गत जिल्ह्याला विभागीय स्तरावरील 16 पुरस्कार प्रदान

Satara News 33 1

सातारा प्रतिनिधी । सन 2022-23 या आर्थिक वर्षात महा-अवास अभियान ग्रामीण 2.00 राबविण्यात आले. यामध्ये विविध वर्गवारीत विभागस्तरावरील 28 पुरस्कार नुकतेच जाहीर झाले असून त्यातील 16 पुरस्कार सातारा जिल्ह्यास प्राप्त झाले आहेत. या पुरस्काराचे सन्मानार्थींना आज जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचे हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. घरकुल पात्र परंतु … Read more

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा जिल्ह्यातील ‘या’ 5 ठिकाणी असणार मुक्कामी

Satara News 28 1

सातारा प्रतिनिधी । श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सुरू होणार आहे. दि. 6 जुलै 2024 रोजी पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होणार आहे. दि. 11 जुलै 2024 रोजी पालखी सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार असून सातारा जिल्हयामध्ये पालखीचे लोणंद, तरडगांव, फलटण व बरड येथे एकूण ५ मुक्काम असणार आहेत. पालखी सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज … Read more

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वाहतूकीत बदल; पोलीस अधीक्षकांचे महत्वाचे आवाहन

Satara News 20 1

सातारा प्रतिनिधी । श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. 6 जुलै ते दि. 11 जुलै अखेर सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे. या अनुषंगाने वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे. वाहतूक बदलाबाबत पोलीस अधीक्षक शेख यांनी म्हंटले आहे … Read more

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ‘या’ दिवशी होणार साताऱ्यात दाखल; 5 दिवस मुक्काम

Satara News 1 2

सातारा प्रतिनिधी । संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ६ जुलै रोजी साताऱ्यात दाखल होणार आहे. पालखी सोहळ्याचा जिल्ह्यात पाच दिवस मुक्काम असणार आहे. या दृष्टीने प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली असून लाखो वारकऱ्यांचे लक्ष लागलेला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २९ जूनपासून आळंदीतून सुरू होणार आहे. तर ११ जुलै रोजी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करुन … Read more

लोणंद पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने तडीपार इसमास घेतले ताब्यात

Crime News 11

सातारा प्रतिनिधी । लोणंद पोलीस ठाणे हद्दीतील तडीपार असलेल्या इसमास डीबी पथकाने नुकतीच अटक केली. शेखर शरद खताळ (वय ३२, रा. कापडगाव ता. फलटण जि. सातारा) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि.१८/०६/२०२४ रोजी लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री सुशिल भोसले यांचे आदेशान्वये डीबी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल … Read more

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीकडून लोणंद पालखी तळाची पाहणी; प्रशासनास केल्या ‘या’ सूचना

Phaltan News 1 1

सातारा प्रतिनिधी । श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सालाबादप्रमाणे दि. 29 जून 2024 रोजीपासून सुरू होणार आहे. दि. 6 जुलै 2024 रोजी पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होणार असून दि. 11 जुलै 2024 रोजी पालखी सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. या पार्श्वभूमीवर काल ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने लोणंद पालखी तळ, विसावा, तरडगाव … Read more

फलटणला विद्यार्थ्यांना मिळाले 3 दिवसात दोन हजार दाखले

Phaltan News 1

सातारा प्रतिनिधी । दहावी, बारावीचे निकाल झाल्यानंतर लगबग सुरू होते ती महाविद्यालयाच्या पुढील प्रवेशाची. आता जवळपास सर्वच प्रवेशासाठी विविध शासकीय दाखले त्यामध्ये उत्पन्न, जातीचा, डोमासाईल, EWS, अल्पभूधारक शेतकरी असे दाखले लागत असतात. फलटण तालुक्यातील विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी तब्बल 3 दिवसांमध्ये 2 हजारहून अधिक दाखले जारी केले आहेत. … Read more

मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीमुळे फलटणला 8 टँकरची संख्या झाली कमी : प्रांताधिकारी सचिन ढोले

Phaltan News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी दुष्काळी परिस्थिती सर्वत्र होती. तालुक्यामध्ये एकूण 42 गावांना 33 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात होता. गेल्या चार दिवसांपासून झालेल्या मान्सून पूर्व पावसामुळे टँकरची संख्या कमी झाली आहे. सध्या फलटण तालुकयातील 42 गावांना 25 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. पावसाच्या अंदाजाने आगामी काळामध्ये ही … Read more