सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविता यावे. त्यांना बचतीची सवय लागावी अशाप्रमाणे अनेक मोहीम व योजना शासनाच्या वतीने राबविल्या जातात. त्यापैकी एक अशी मोहीम सातारा डाक विभागाच्यावतीने राबविली जात आहे. सातारा डाक विभागाच्यावतीने अनेक मोहिमा राबवित केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवली जाते. याचाच एक भाग म्हणून सातारा डाक विभागामार्फत महिला तसेच मुलीसाठी एक विशेष मोहीम राबविली जात आहे. महिला सम्मान बचत पत्र उघडण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन डाक विभागाच्यावतीने करण्यात आले असून दि. 10 जुलै 2023 ते दि. 12 जुलै 2023 या कालावधीमध्ये हि मोहीम राबविली जाणार आहे.
डाक विभागाच्यावतीने आयोजित ही अनोखी अशी योजना महिला व मुलींकरिता उपलब्ध असून बचत पत्राची मुदत 2 वर्षे राहील. एका महिलेच्या नावावर किंवा अज्ञान मुलींच्यावतीने तिच्या नावावर तिचे पालक बचत पत्र घेऊ शकतात. बचत पत्रामध्ये किमान 1 हजार रुपयांपासून कमाल मर्यादा 2 लाख (100 च्या पटीत ) एवढी गुंतवणूक करता येईल. दि. 1 एप्रिल 2023 ते 30 जुन 2023 या तिमाहीमध्ये सध्याचे व्याजदर 7.5 टक्के प्रति वर्षे एवढे असून व्याज हे चक्रवाढ पध्दतीचे असेल.
दर 3 महिन्याच्या फरकाने एका व्यक्तीच्या नावाने कितीही खाते उघडता येणार असून त्यासाठी २ लाख रुपये इतकी मर्यादा असणार आहे. एक वर्षे झाल्यानंतर खात्यातील 40 टक्के रक्कम एकदाच काढता येणार आहे. अपवादात्मक परिस्थितीशिवाय खाते मुदतपूर्व बंद करता येणार नाही. ही योजना राबविण्याकरिता जिल्हयातील सर्व ग्रामपंचायत, नगर परिषद, प्राथमिक व माध्यमिक शाळा, गैरसरकारी संस्था, खासगी संस्था यांनी पुढाकार घेऊन आपल्या भागातील सर्व महिला तसेच मुलींचे खाते उघडू शकता येणार आहे.
सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना या मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन डाक विभागातर्फे करण्यात येत आहे. मोहिमेचा लाभ घेण्यातसाठी व खाते उघडण्यासाठी आपल्या जवळच्या डाक कार्यालयातमध्ये किंवा सातारा विभागीय कार्यालय, सातारा संपर्क क्रमांक 02162/237443, 237437 Email ID- [email protected]. Website- www.indiapost. gov.in यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सातारा डाक विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.