आर्थिक फसवणुकीच्या आरोपींवर कठोर कारवाई; 59 कोटींची मालमत्ता जप्त करण्याची तयारी सुरू

0
989
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये आरोपींची मालमत्ता जप्त करण्याच्या प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रकरणात आरोपींनी ठेवीदारांची पुंजी गिळंकृत केली होती, ज्यामुळे अनेकांना आर्थिक नुकसान झाले आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचे तपास सोपविण्यात आले असून, आरोपींच्या अटकेपासून त्यांची मालमत्ता जप्त करण्याच्या प्रक्रियेत अधिकारी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. सध्या ५९ कोटी ५७ लाखांची मालमत्ता जप्त करण्याचे प्रस्ताव पाठविले गेले आहेत.

आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये अनेक ठेवीदारांना नुकसान झाले आहे. पतसंस्था, सहकारी बँका, बचत गट, शेअर मार्केट अशा संस्थांमध्ये पैसे गुंतवल्यानंतर अनेकांना पश्चातापाची वेळ आली आहे. या प्रकरणांमध्ये आरोपींवर गुन्हा दाखल करण्यापासून त्यांची मालमत्ता जप्त करण्यापर्यंतची प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ आहे. आरोपींच्या मालमत्तेची खरी कागदपत्रे जमा करणे, मालमत्ता कोणत्या ठिकाणी आहेत, याचा शोध घेणे आणि कोणत्या मालमत्तेवर किती कर्ज आहे, याची सारी माहिती घेऊन नंतर आरोपीला अटक केली जाते.

अटक झाल्यानंतरही आरोपींकडून तातडीने रिकव्हरी होत नाही, त्यामुळे मालमत्ता जप्त करण्यासाठी बराच कालावधी लागतो. वाई येथील हरिहरेश्वर बँकेतील ठेवीदारांना तब्बल ६० कोटी रुपये परत मिळवून देण्यात या शाखेचा मोठा वाटा आहे. सध्या आर्थिक गुन्हे शाखेने ८ प्रस्ताव पाठविले आहेत, ज्यामध्ये ५९ कोटी ५७ लाखांची आरोपींची मालमत्ता जप्त होणार आहे. ही कारवाई ठेवीदारांसाठी आशेचा किरण आहे.