दुचाकी चोरट्याला अटक; सातारा पोलिसांनी केली 4 वाहने जप्त

0
4
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातार्‍यातील चारभिंती ते अजिंक्यतारा रस्त्यावर सातारा शहर पोलिस गस्त घालत असताना रेकॉर्डवरील अजित हणमंत पवार (वय 23, रा. मंगळवार पेठ, सातारा) याला ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता 4 दुचाकी चोरी केल्याची कबुली पवार याने दिली. यानंतर पोलिसांनी संबंधित वाहने जप्त केली आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. यामुळे गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलिस गस्त घालत होते. चारभिंती परिसरात अजित पवार हा युवक पोलिसांना संशयास्पदरीत्या आढळून आला. त्याच्याकडे विना क्रमांकाची दुचाकी व 3 मोबाईल होते. पोलिसांनी दुचाकी व मोबाईलबाबत विचारणा केली असता त्याने समर्पक उत्तरे दिली नाहीत. यावरुन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व अधिक चौकशीला सुरुवात केली.

शहर पोलिस संशयित अजित पवार याच्याकडे चौकशी करत असताना त्याने एकूण 3 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दुचाकी व मोबाईल असा सर्व मुद्देमाल जप्त करुन त्याला अटक केली. दुचाकी चोरीबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. पोनि राजेंद्र मस्के, पोनि सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्याम काळे, फौजदार सुधीर मोरे, पोलिस निलेश यादव, सुजीत भोसले, निलेश जाधव, विक्रम माने, पंकज मोहिते, इरफान मुलाणी, तुषार भोसले, सागर गायकवाड, राचिन रिटे, संतोष घाडगे, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, यांनी कारवाईत सहभाग घेतला.