सातारा प्रतिनिधी । आज साताऱ्यातील इंडिया आघाडीची बैठक अत्यंत हसत खेळत, प्रत्येकाचा विचारविनिमय घेत पार पडली. यामध्ये उमेदवारीचीही चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर खासदार शरद पवार यांनी साताऱ्याला पाठविलेल्या हेलिकॉप्टरमधून चार नेते मुंबईत दाखल झाले. दरम्यान या हेलिकॉप्टर मधील नेत्यांचा व्हिडिओ हा सोशल मीडिया व्हायरल झाला आहे. साताऱ्याच्या उमेदवारीबाबत मुंबईत सातारा जिल्ह्यातील नेत्याच्या उपस्थितीत महत्वाच्या बैठक पार पडत आहे. लवकरच उमेदवाराची घोषणा होईल.
या दरम्यान मुंबईत सुरू असलेल्या महत्वाच्या बैठकीत साताऱ्यातील खासदारकीच्या उमेदवारीवर चर्चा केली जात असून लवकरच त्या उमेदवाराचे नाव सर्वांसमोर येईल. मात्र, राष्ट्रवादी कॉँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात शरद पवार हे आपला तो हुकमी एक्का पुन्हा बाहेर काढणार हे नक्की.
एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात इतर लोकसभा मतदार संघापैकी सातारा लोकसभा मतदार संघातीळ उमेदवारीच्या निवडीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. साताऱ्यात भाजपकडून काहीही झालं तर आपलाच उमेदवार निवडून आणायचा असे ठरवले आहे. त्या दृष्टीने भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्ये कामाला देखील लागले आहेत. मात्र, बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात आपलाच उमेदवार निवडून आणणार असे सांगत पवारांनी आज जिल्ह्यातील महत्वाच्या नेत्यांना मुंबईत बोलून त्यांच्याशी चर्चा सुरु केली आहे.
शरद पवार गटातील विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, खासदार पुत्र सारंग पाटील की सातारा जिल्हा बॅंकेचे संचालक सत्यजित पाटणकर यांची नावे लोकसभेसाठी चर्चेत आहेत. यापैकी कुणाचं नाव निश्चित होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
‘त्या’ मेळाव्यानंतर जयंत पाटलांनी पवारांशी केली महत्वाची चर्चा
सातारा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पाटण, उंब्रज, कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा विजय निश्चित मेळावे घेण्यात आले. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. या मेळाव्यात कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची साताऱ्याची उमेदवारी नेमकी कुणाला द्यायची? उमेदवारीसाठी कोण कोण इच्छुक आहेत? कुणाला उमेदवारी दिल्यास कार्यकर्त्यांना अधिक आवडेल याची चाचपणी जयंत पाटील यांनी केली. या दौऱ्यानंतर जयंत पाटील यांनी सातारा लोकसभा उमेदवारीच्या निवडीबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा देखील केली आहे.