सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयास १५० ९००१:२०१५ मानांकन प्राप्त झाले आहे. तसेच यामुळे आयएसओ मानांकनात कृषी विभागात राज्यात जिल्हास्तरावरील कार्यालयाचा मानही साताऱ्याला मिळाला आहे.
कृषी विभागाकडून देण्यात आलेली माहिती अशी की, हे मानांकन प्रामुख्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी उत्तम व्यवस्था करणे, कार्यालयातील अभिलेखांचे वर्गीकरण, अभिलेख कक्षात अभिलेखांची शाखानिहाय सुव्यवस्थित मांडणी करणे, कार्यालयाची साफसफाई, सुशोभीकरण, प्रत्येक मेजनिहाय सहा गढ्ढे पध्दत, प्रत्येक शाखेची मानक कार्यप्रणाली तयार करणे, शासनाकडील सूचनानुसार प्रसिध्द करावयाचे माहितीदर्शक फलक लावणे आदी बाबींच्या पूर्ततेच्या अधीन राहून केले जाते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आयएसओ मानांकनासाठी आवश्यक बाबीची पूर्तता करण्यासाठी परिश्रम घेतले होते.
तसेच या कार्यालयातील लेखाधिकारी शीतल करंजेकर यांनीही विशेष महत्त्वपूर्ण योगदान दिले. याबद्दल पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिन ध्वजारोहण समारंभाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमावेळी कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सर्व कार्यालयांत SO मानांकनसाठी प्रक्रिया राबविणार : भाग्यश्री फरांदे
नुकतेच सातारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयास १५० ९००१:२०१५ मानांकन प्राप्त झाले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त सर्व कार्यालयांचेही याच पध्दतीने मानांकन मिळविण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी हॅलो महाराष्ट्रशी बोलताना सांगितले.