शेतकऱ्यांनो ई-केवायसी केला का? कृषी विभागाने केलंय महत्वाचं आवाहन

Satara News 83

सातारा प्रतिनिधी । खरीप हंगाम 2023 हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पीकांची ई पीक पाहणी केली होती, अशा कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शासनामार्फत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तरी अर्थसहाय्य मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावी आणि अधिक माहितीसाठी कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी … Read more

शेळी-मेंढी गटासाठी मिळतेय ‘इतके’ टक्के अनुदान; एकदा अर्ज केल्यास 5 वर्षात कधीही होते निवड

Satara News 20240929 142821 0000

सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्रातील बहुतांशी लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. शेतकऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे शेतीसोबत जोड व्यवसाय म्हणून शेतकरी शेळी-मेंढी तसेच गाय- म्हशीचे पालन करतात. यामध्ये राज्य शासनही राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेतून शेळी-मेंढी गटासाठी ७५ टक्के अनुदान देत आहे. यात एकदा अर्ज केला की पाच वर्षांत कधीही निवड होत असते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर … Read more

जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांसाठी कृषी विभागाने केलं ‘हे’ महत्वाचं आवाहन

Satara News 76

सातारा प्रतिनिधी । राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी केलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे ई पीक पाहणी यादीमध्ये नाव असलेल्या शेतकरी बांधवानी, आपले आधार विषयक संमतीपत्र/ना-हरकत पत्र तयार करावे. आणि संबधित कृषि सहाय्यक्, कृषि पर्यवेक्षक ,मंडल कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे तत्काळ सादर … Read more

जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयास ISO मानांकन प्राप्त; राज्यातील कृषी विभागातील जिल्हास्तरावरील पहिले कार्यालय

Satara News 69

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयास १५० ९००१:२०१५ मानांकन प्राप्त झाले आहे. तसेच यामुळे आयएसओ मानांकनात कृषी विभागात राज्यात जिल्हास्तरावरील कार्यालयाचा मानही साताऱ्याला मिळाला आहे. कृषी विभागाकडून देण्यात आलेली माहिती अशी की, हे मानांकन प्रामुख्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी उत्तम व्यवस्था करणे, कार्यालयातील अभिलेखांचे वर्गीकरण, अभिलेख कक्षात अभिलेखांची शाखानिहाय सुव्यवस्थित मांडणी करणे, … Read more

सातारा जिल्ह्यात खरीप हंगाम पेरणी अंतिम टप्प्यात; आतापर्यंत ‘इतक्या’ लाख हेक्टरवर पेरणी पूर्ण

Agriculture News 20240713 083209 0000

सातारा प्रतिनिधी | पेरणीसाठी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील खरीप हंगाम पेरणी अंतिम टप्प्यात असून अडीच लाख हेक्टरवर पूर्ण झाली आहे. हे प्रमाण ८७ टक्के इतके झाले आहे. त्यामुळे यंदा चांगल्या पावसामुळे वेळेत पेरणी पूर्ण होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र हे २ लाख ८८ हजार ४९४ हेक्टर निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये … Read more

सातारा जिल्ह्यात ‘इतक्या’ हजार शेतकऱ्यांनी केली मृद तपासणी!

Satara Agri News

सातारा प्रतिनिधी । शेत जमिनीतील माती तपासल्यानंतर अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते. त्यानुसार समतोल व योग्य प्रमाणात खताची मात्रा देऊन पीक उत्पादनात वाढ करता येते. यासाठी माती परीक्षण महत्त्वाचे ठरत असून जिल्ह्यातही शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढत आहे. २०२३-२४ वर्षात १३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी मृद तपासणी केली आहे. तर साडेआठ हजार शेतकऱ्यांना आरोग्यपत्रिकांचे वाटप झाले आहे. जमिनीचे अनेक प्रकार … Read more

कृषी विभागाने काढली वडजलपासून फलटणपर्यंत टाळमृदुंगाच्या गजरात दिंडी

Phalatan News

सातारा प्रतिनिधी | संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे औचित्य साधून फलटण, जिल्हा सातारा येथे शेतकर्‍यांना विविध योजनेची माहिती देणारे चित्ररथ व दिंडीच्या माध्यमातून कृषी योजनेचा शेतकर्‍यांमध्ये जनजागृती उपक्रम जिल्हा कृषी विभागाच्यावतीने घेण्यात आला. यावेळी फलटण कृषी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी वडजलपासून फलटण कृषी कार्यालयापर्यंत टाळमृदुंगाच्या गजरात दिंडी काढली. यावेळी काढलेल्या या दिंडीमध्ये पाणी … Read more

शेतकऱ्यांना पीकविम्याची 115 कोटींची भरपाई, 5 वर्षांतील सर्वात मोठी रक्कम

Satara News 20240704 195335 0000

सातारा प्रतिनिधी | प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील सुमारे सवा दोन लाख शेतकऱ्यांना ११५ कोटी रुपयांची भरपाई मिळाली आहे. हे पैसे संबंधितांच्या बॅंक खात्यावरही वर्ग झालेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, पावसातील खंड, ढगफुटी, चक्रीवादळ आदी कारणाने पिकांचे नुकसान झाल्यास विमा उतरविलेल्या पिकांसाठी भरपाई देण्यात येते. यासाठी पूर्वी शेतकऱ्यांना ठराविक रक्कम … Read more

खरीप हंगामाच्या अनुषंगाने कृषी अधिक्षक भाग्यश्री फरांदे शेतकऱ्यांच्या बांधावर; पीकाबाबत केले तांत्रिक मार्गदर्शन

Satara News 20240704 175819 0000

पाटण प्रतिनिधी | खरीप हंगामाच्या अनुषंगाने पाटण तालुक्यातील तारळे, पाटण व देबेवाडी मंडळांतर्गत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर भेटी दिल्या. या भेटी दरम्यान मौजे बोरगेवाडी येथे फरांदे यांनी नाचणी पीक प्रात्यक्षिक क्षेत्रास भेट दिली व नाचणी पिकाची लागण केली व उपस्थित शेतकऱ्यांना नाचणी पीकाबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले. कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत … Read more

फलटण तालुक्यात कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाची धडक कारवाई

Crime News 20240703 150019 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण तालुक्यात कृषी निविष्ठा भरारी पथकाने विविध कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली. यामध्ये ४ लाख ५७ हजार ८४५ रुपये किमतीच्या रासायनिक खतांची विक्री बंद करण्याचे आदेश दिले. तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड व पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा गुण नियंत्रण निरीक्षक नवनाथ फडतरे यांनी संयुक्त कारवाई केली. यावेळी गायकवाड म्हणाले की, ”कृषी … Read more

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचे उत्पादन वाढविणे सहज शक्य : दत्तात्रय गायकवाड

Phalatan News 20240701 190326 0000

सातारा प्रतिनिधी | कृषी आणि फलोत्पादन क्षेत्रामध्ये फलटण तालुका अग्रेसर असून शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतीचे उत्पादन वाढविणे व आर्थिक उन्नती साधने सहज शक्य आहे, यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग शेतकऱ्यांच्या सतत पाठीशी आहे.असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी केले. शेरेचीवाडी(ढवळ) ता. फलटण येथे हरितक्रांतीचे प्रणेते … Read more

गावठाण हद्दीत आजपासून शंभर वृक्षांची लागवड; जुलैअखेर राबवली जाणार मोहीम

Satara news 20240701 091858 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दि. १ ते २८ जुलैअखेर महाराष्ट्र कृषिदिन ते जागतिक संवर्धन दिनापर्यंत वृक्षारोपण मोहीम जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत राबवण्यात येणार आहे. गावठाण परिसरात सुमारे १०० झाडे लावण्यावर भर दिला जाणार आहे. सातारा जिल्ह्यात मार्च २४ ते मे २४ या कालावधीत उच्चांकी तापमान झाले होते. वृक्ष लागवड कालाधीत ग्रामपंचायतींनी … Read more