सातारा जिल्ह्यात झाला ‘इतका’ पाऊस; पहा तालुका निहाय आकडेवारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात मग्लवर आणि बुधवारी दोन दिवसात पावसाने अल्पशा हजेरी लावली. दि. 9 जुलै रोजी सरासरी 1.4 मि.मी. पावसाची नोंद झाली असून 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 324.3 मि.मी. पाऊस पडला आहे. तर कोयना पाणलोट क्षेत्रात देखील आज बुधवारी पावसाने कमी हजेरी लावली असून धरणात 32.79 टीएमसी इतका पाणीसाठा निर्माण झाला आहे.

आज बुधवारी सायंकाळी 5 वाजता आलेल्या आकडेवारीनुसार धरणात 32.79 टीएमसी पाणीसाठा झाला असून 31.15 टक्के धरण भरले आहे. तर धरणात 8 हजार 275 क्युसेकने पाण्याची आवक होत आहे.

सातारा जिल्ह्यात तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. सर्व आकडे मि.मी.मध्ये असून कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे आहेत. सातारा – 0.6 (280.7), जावली-मेढा – 2.2 (490.1), पाटण – 0.4 (400.6), कराड – 0.8 (267.1), कोरेगाव – 1.6 (298.2), खटाव – वडूज – 0.5 (277.5), माण – दहिवडी – 2.1 (238.9), फलटण – 0.3 (259.0), खंडाळा – 2.9 (139.6), वाई – 1.0 (264.3), महाबळेश्वर – 9.9 (931.1) याप्रमाणे पाऊस झाला आहे.

Koyna Dam

Date : 10/07/2024
Time : 05:00 PM
Water level : 2081’08” (634.492m)

Dam Storage :
Gross: 32.79 TMC (31.15%)
Live: 27.67 TMC (27.63%)

Inflow : 8,275 Cusecs.

Discharges

KDPH: 00 Cusecs.
Total Discharge in koyna River: 00 Cusecs

Rainfall in mm – (Daily/Cumulative)
Koyna- 00/1563
Navaja- 00/1708
Mahabaleshwar- 01/1353