कराड प्रतिनिधी | साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील हे आपल्या दिलखुलास व्यक्तिमत्वामुळे सर्वपरिचित आहेत. अधिकाऱ्यापासून ते लोकप्रतिनिधी होऊनही त्यांनी ग्रामीण भागाशी आपली नाळ सुरुवातीपासून आतापर्यंत टिकून ठेवली आहे. त्यांच्याप्रमाणे त्यांचे सुपुत्र सारंग पाटील यांनी देखील सर्व सामान्य लोकांमध्ये मिसळत आहे. गणेशोत्सवानिम्मित त्यांच्याकडून मतदार संघातील गावागावात जाऊन गणरायाला वंदन करत विकास कामांची भूमिपूजन केली जात आहेत.
सारंग पाटील यांनी नुकतेच काही गावात जाऊन भूमिपूजन कार्यक्रमांना उपस्थिती लावली. त्यामध्ये सळवे ता.पाटण येथे खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या बीएसएनएल टॉवरचा भूमिपूजन समारंभ नुकताच पार पडला. यावेळी सळवे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांच्याशी संवाद साधला.
याप्रसंगी बीएसएनएलच्या टेलिफोन सल्लागार समितीचे सदस्य व पंचायत समितीचे माजी उपसभापती रघुनाथराव जाधव-तात्या, बीएसएनएलचे उपअभियंता श्री.माळी, प्रतापराव देसाई, ॲड. ए. पी. पाटील, श्री.दिलीप कोळेकर, श्री. अविनाश पाटील, श्री. सचिन जाधव, श्री. संदीप जाधव, श्री. श्रीकांत पाटील, श्री. श्रीरंग चाळके, श्री. सागर पाटील, श्री.विक्रम नलवडे अन्य मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांचे सुपुत्र सारंग पाटील यांनी पाटण विधानसभा मतदार संघातील गावांना नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या फंडातून करण्यात आलेल्या अनेक विकासकामांचे भूमिपूजन केले.
‘या’ ठिकाणी विकासकामांचे भूमिपूजन
यावेळी सारंग पाटील यांनी प्रथम निगडे ता. पाटण येथे खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या पेव्हर ब्लॉक बसविणे कामाचा भूमिपूजन समारंभ केले. त्यानंतर
सळवे येथे बीएसएनएल टॉवरच्या भूमिपूजन समारंभास उपस्थिती लावली. तसेच ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर महिंद येथे गणेश उत्सव मंडळास भेट देऊन बाप्पाचे दर्शन घेतले. याप्रसंगी जमलेल्या नागरिकांशी संवाद साधला. पुढं बोरगेवाडी (सळवे) रस्ते काँक्रेटीकरण करणे कामाचा भूमिपूजन समारंभास उपस्थिती लावली. अशा प्रकारे खासदार पुत्र सारंग पाटील यांच्याकडून विकासकामांचे भूमिपूजन करीत सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधला जात आहे. त्यांच्या या संवाद उपक्रमाची चांगलीच चर्चा होत आहे.