फलटणमध्ये उद्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळ स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | फलटण येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळ स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ उद्या गुरुवार दि. 11 जुलै रोजी सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी आयोजित करण्यात आलेला आहे. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर उपस्थित राहणार आहेत.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा फलटण येथे मुक्कामी असतो. श्री. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा फलटण मुक्काम उरकून बरडकडे मार्गस्थ झाल्यानंतर एका दिवसानी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पालखीतळाची स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ प्रतिवर्षी करण्यात येत असतो.

दरवर्षी पालखी तळ स्वच्छता मोहिमेमध्ये फलटण एज्युकेशन सोसायटी, गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट, श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक यांच्यासह फलटण नगर परिषद, सातारा जिल्हा परिषद व फलटण पंचायत समितीचा सुद्धा सहभाग यामध्ये असतो.