सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी दुष्काळी परिस्थिती सर्वत्र होती. तालुक्यामध्ये एकूण 42 गावांना 33 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात होता. गेल्या चार दिवसांपासून झालेल्या मान्सून पूर्व पावसामुळे टँकरची संख्या कमी झाली आहे.
सध्या फलटण तालुकयातील 42 गावांना 25 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. पावसाच्या अंदाजाने आगामी काळामध्ये ही सुद्धा टँकर संख्या कमी करण्यासाठी फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनि सूक्ष्म असे नियोजन केले आहे.
दि. 31 मे पर्यंत फलटण तालुक्यात 42 गावांना 33 टँकरद्वारे दररोज 86 खेपांच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात होता. गेल्या चार दिवसातील पावसानंतर दि. 11 जुन अखेर 34 गावांना 25 टँकरच्या माध्यमातून 61 खेपांच्या द्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. म्हणजेच एकूण 8 गावांमधील 8 टँकर कमी झाले असून एकूण 25 टँकरच्या 25 खेपा कमी झाल्या आहेत.
पाणी प्रश्न आणि उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा केली जाणार
प्रशासनाने केलेल्या उत्तम नियोजनामुळे फलटण तालुक्यातील 8 गावांमधील 8 टँकर कमी झाले आहे. एकूण 25 टँकरच्या 25 खेपा कमी झाल्या आहेत. आज आमदार दिपक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी आढावा बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत तालुक्यातील पाणी प्रश्न आणि त्यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा केली जाणार असल्याची प्रतिक्रिया प्रांताधिकारी सचिन ढोले ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.