सातारा प्रतिनिधी । मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने सुरु केली. निवडणुकीमध्ये त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतल्याने काहीसा ब्रेक लागला होता. पुन्हा ही योजना सुरु राहिल काय याबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. हिवाळी अधिवेशन संपले आणि त्यानंतर सातारा जिल्ह्यातील लाडक्या असलेल्या ५ लाख १८ हजार ४५१ बहिणींच्या खात्यावर १५०० रुपये राज्य सरकारकडून जमा करण्यात आले. जिल्ह्यात सुमारे ७७ कोटी ७६ लाख ७६ हजार ५०० रुपये एकदंर जमा झाल्याने जिल्ह्यातील बहिणींमध्ये आनंदी आनंद आहे. जिल्ह्यातील ५ लाख १८ हजार ४५१ महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा झाले आहेत.
डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3500 कोटी रुपयांची तरतूद
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पाच हप्त्यांची रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. जुलै ते नोव्हेंबर पर्यंत 1500 रुपयांप्रमाणे 7500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. निवडणुकीपूर्वीच महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याची रक्कम आली होती. आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेली आहे.
ही योजना का विशेष आहे?
1) आर्थिक आधार: महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाला स्थैर्य देण्यासाठी आधार.
2) सन्मानाचा भाव: केवळ निधी देण्यापुरती ही योजना मर्यादित नसून महिलांच्या आत्मसन्मानाला प्रोत्साहन देणारी आहे.
3) सशक्तीकरण: महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न, जो त्यांच्या जीवनाचा स्तर उंचावण्यात मदत करतो.
जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात किती लाभार्थी
सातारा तालुका : ७६ हजार ४११ लाभार्थी
जावली तालुका : २० हजार ८४३ लाभार्थी
कोरेगाव तालुका : ५० हजार ५८० लाभार्थी
माण तालुका : ३४ हजार ८८५ लाभार्थी,
खटाव तालुका : ४८ हजार ८६८ लाभार्थी
वाई तालुका : ३६ हजार ७२५ लाभार्थी
खंडाळा तालुका : २३ हजार ८३२ लाभार्थी
महाबळेश्वर तालुका : १० हजार ५६९ लाभार्थी
फलटण तालुका : ५८ हजार ३७७ लाभार्थी
पाटण तालुका : ५९ हजार ११४ लाभार्थी
कराड तालुका : ९८ हजार २४७ लाभार्थी
एकूण लाभार्थी : ५ लाख १८ हजार ४५१
एकूण जमा झालेली रक्कम : ७७ कोटी ७६ लाख ७६ हजार ५०० रुपये