सातारा प्रतिनिधी । पावसाळ्यात डोंगराळ आणि दुर्गम अशा भागात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. खास करून पाटण तालुक्यात दरडी कोसळण्याच्या घटना जास्त पहायला मिळतात. याचबरोबर महाबळेश्वर, कोयना, कास, बामणोली, तापोळा, कांदाटी खोऱ्यात पर्जन्यमान अधिक राहते. त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत होते. अनेक दिवस लोकांना घराबाहेर पडता येत नाही. अतिवृष्टीच्या काळात कोयना, कृष्णा नदीला महापूर येतो. काहीवेळा पाणी पात्राबाहेर जाते. यासाठीही जिल्हा प्रशासनाला दक्ष राहावे लागते. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील महाबळेश्वर, जावली, पाटण, वाई तालुक्यातील १३८ गावांत दरडी कोसळण्याचा धोका असून ४१ दरडप्रवण गावे आहेत. या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना पावसाळ्यात भीतीच्या छायेखाली राहावे लागते.
पावसाळ्यात जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात अनेक गावांवर दरडी आणि भूस्खलनाच्या भीतीचे सावट उभे राहते. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील महाबळेश्वर, जावली, पाटण, वाई तालुक्यातील १३८ गावांत दरडी कोसळण्याचा धोका उद्भवतो.
यामध्ये जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्यातील धावली, घावरी, चिखली, भेकवली, एरंडल, नावली, दरे, दुधोशी, चतुरबेट, असली, येरणे बुद्रुक, येरणे खुर्द, शिंदोळा, कामटवाडी, जावली, बिरवाडी, शिरवली, हातलोट, झांजवड, बिवर, माचुतर, आढाळ, धारदेव, पारुट, मांघर, देवसरे, बारसोळी कोळी, वारसोळी देव, मालुसर, मंजरेवाडी, लामज आदी गावांना धोका संभवतो.
जावळीत 16 गावात दरडी कोसळण्याची भीती
जावली तालुक्यात वाटांबे, मुकवली, रेंगडी, बाहुळे, मायणी, तळदेव, मान्टी, रांजणी वाळंजवाडी, तळोसी, बाहिटे, दिवदेव, बोंडारवाडी, नरफदेव, मोरघर (धनगरपेढा) व भुतेथर या गावांना दरडींचा धोका आहे.
महाबळेश्वरात 31 गावांना धोका
जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्यातील धावली, घावरी, चिखली, भेकवली, एरंडल, नावली, दरे, दुधोशी, चतुरबेट, असली, येरणे बुद्रुक, येरणे खुर्द, शिंदोळा, कामटवाडी, जावली, बिरवाडी, शिरवली, हातलोट, झांजवड, बिवर, माचुतर, आढाळ, धारदेव, पारुट, मांघर, देवसरे, बारसोळी कोळी, वारसोळी देव, मालुसर, मंजरेवाडी, लामज आदी गावांना धोका संभवतो.
पाटण तालुक्यात तब्बल 64 गावे दरडग्रस्त
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. तालुक्यात तब्बल ६४ गावे दरडग्रस्त आहेत. त्यामध्ये आंबेघर तर्फ मरळी (वरचे व खालचे), ढोकावळे, हुंबरळी (काटेवाडी), मिरगाव, जितकरवाडी, शिदुकवाडी, काहीर, हुंबरळी, वरंडेवाडी, धदामवाडी, जोतिबाचीवाडी, गुंजाळी (मान्याचीवाडी), दीक्षी, बोरगेवाडी (मेंडोशी), जुगाईवाडी, खुडूपलेवाडी, जितकरवाडी (जिंती), जोशेवाडी, बागलेवाडी, चोपडेवाडी (डावरी), पळसारी (कुसवडे), धनवडेवाडी- शिंदेवाडी (निगडे), झाकडे, धजगाव, मसुगडेनाडी, ताम्हिणी, पाडळोशी, जळव, पाबळवाडी, लेंडोरी (धनगरवाडा), लुगडेवाडी (केरळ), मिरासवाडी (शिरळ), गुजरवाडी (म्हावशी), काळगाव, चाफोली, आरल, मोरगिरी जुने गावठाण, विहे, डफळवाडी, केंजळवाडी, कळंबे, गायमुखवाडी, कुसखंड (शिंदेवस्ती), आंबवणे, बोंदी (गोजेगावबस्ती), तामिणे वाजेगाव धरणाचे आतील, जाईचीवाडी (बोंद्री), भातडेवाडी (जिंती), कवडेवाडी (जंगडी), घोट, बोर्गेवाडी, टोळेवाडी, आरल (निवकणे), आटोली-गुरेघर अंतर्गत कोकणेवाडी, गोकुळनाला (कामरगाव ), किल्ले मोरगिरी, नाटोशी (शिर्केवस्ती), चव्हाणवस्ती, बहिरेवाडी (डोरोशी), विठ्ठलराडी (धनगरवस्ती), शिरळ विठ्ठलवाडी (सणबूर), बाटेवाडी या गावांचा समावेश आहे.
अशी आहेत धोकादायक गावे…
पाटण, सातारा, जावळी, महाबळेश्वर आणि वाई तालुक्यात मिळून सुमारे ४१ दरडप्रवण गावे आहेत. पाटणमध्ये १८ गावांचा समावेश आहे. तर महाबळेश्वर तालुक्यात १५ आणि जावळी ३, वाई ३ तर सातारा तालुक्यातही काही गावे दरडप्रवण क्षेत्रात आहेत. पाटणमध्ये आंबेघर खालचे, आंबेघर वरचे, मिरगाव, शिद्वकवाडी, जितकरवाडी, काहीर, ढोकावळे या गावांचा समावेश आहे. या भागात तीन वर्षांपूर्वी अतिवृष्टी होऊन दरड कोसळली होती. त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला होता. तसेच पशुधनाचीही हानी झालेली. महाबळेश्वर तालुक्यात दरे, दुधोशी, येरणे बुद्रुक, येरणे खुर्द, घावरी, चतुरबेट, एरंडल आर्ट गावे दरडप्रवण आहेत सातारा तालुक्यात टोळेवाडी, जावळीत भुतेघर आणि वाई तालुक्यात कोंढावळ आणि जोर गावांचा धोकादायक गावात समावेश आहे.
दरडग्रस्त व भूस्खलनग्रस्त गावांच्या पुनर्वसन, बांधकामांबाबत आढावा
पाटण तालुक्यातील दरडग्रस्त व भूस्खलनग्रस्त गावांच्या पुनर्वसन, बांधकाम व पायाभूत सुविधांच्या कामांबाबत पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली आहे. यावेळी भूस्खलनबाधित गावांमधील कुंटुबांचे गोकूळ तर्फ पाटण, काहीर, शिद्रुकवाडी (धावडे), चाफेर, देशमुखवाडी, मोडकवाडी याठिकाणी घरकुले बांधून देवून पुनर्वसन करण्यात येणार आहे. 199 कोटी 57 लाख खर्चून पुनर्वसनाचे काम करण्यात येणार आहे. घरे बांधून देणे व तेथील ले ऑउट विकासकामे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी करावी, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.
पाटण तालुक्यातील ‘त्या’ गावांच्या पुनर्वसनास शासनाची मान्यता
पाटण तालुक्यातील आंबेघर खालचे, आंबेघर वरचे, ढोकावळे, मिरगाव, हुंबरळी, शिद्रुकवाडी, जितकरवाडी, (जिंती), काहीर, या अतिवृष्टीमुळे भूस्खलन बाधित गावांच्या पुनर्वसनास शासनाने मान्यता दिली आहे. या गावांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनाअंतर्गत बाधित कुटुबांना द्यावयाची प्रस्तावित असलेली 558 घरकुले व इतर सुविधा दिल्या जाणार आहेत.
99 कोटी 57 लाख खर्चून पुनर्वसनाचे काम
भूस्खलनबाधित गावांमधील कुंटुबांचे गोकूळ तर्फ पाटण, काहीर, शिद्रुकवाडी (धावडे), चाफेर, देशमुखवाडी, मोडकवाडी याठिकाणी घरकुले बांधून देवून पुनर्वसन करण्यात येणार आहे. 199 कोटी 57 लाख खर्चून पुनर्वसनाचे काम करण्यात येणार आहे.
मोरणा, कोयना भागात 29 जणांचा बळी
पाटण तालुक्यात तीन वर्षांपूर्वी 2021 मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मोरणा विभागात आंबेघर, तर कोयना विभागात ढोकावळे, मिरगाव येथे मध्यरात्री सुमारास भूस्खलन होऊन काही समजण्याच्या आत तेथील घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती, मोरणा आणि कोयना विभागात झालेल्या दुर्घटनेत २९ जणांचा जीव गेला. अनेकांची कुटुंब नाहीशी झाली. याप्रसंगी अनेक नेते, मंत्री, पडूनही लोकप्रतिनिधींनी बाधितांना भेटी देऊन नाली मदतीचे फोटोसेशन करून गेले. अनेकांनी पुनर्वसनबाबत आश्वासने दिली. मात्र, काहीच घडले नाही.
जिल्ह्यातील दरड कोसळून विस्कळीत होणारे मार्ग…
१) मेढा-महाबळेश्वर मार्ग (केळघर घाट)
२) वाई-पाचगणी मार्ग (पसरणी घाट)
३) चिपळूण-कऱ्हाड मार्ग (कुंभार्ली घाट)
४) सज्जनगड-ठोसेघर मार्ग
५) महाबळेश्वर-पोलादपूर मार्ग (आंबेनळी घाट)
६) शेंद्रे ते बामणोली मार्ग (यवतेश्वर घाट)