बारामतीचे पाणी फलटणला आणल्यामुळेच खासदारकी गेली – माजी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सासवड, ता. फलटण येथील धोम बलकवडी मायनर 37 व 33 च्या उदघाटन रणजितसिंह नाईक निंबाळकर व ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पराभवामागचे कारण बोलून दाखवले. बारामतीचे पाणी फलटणला आणल्यामुळेच आपली खासदारकी गेली आहे. परंतु, फलटण खासदारकी गेली, तरी फलटण तालुक्याच्या विकासाबाबत कसलीही तडजोड करणार नसल्याचे प्रतिपादन माजी खा. निंबाळकर यांनी म्हंटले.

यावेळी फलटण कोरेगाव विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, धनंजय साळुंखे पाटील, संत कृपा डेअरीचे प्रमुख विलासराव नलवडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, शहराध्यक्ष अमोल सस्ते, माजी नगरसेवक अनुप शहा यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी धोम बलकवडी लघुवितरिका, सासवड ते माळीबेंद रस्ता, माळी बेंद ते रासकर वस्ती रस्ता, लघुबंधारे, विद्युत पोल, महालक्ष्मी मंदिर संभामंडप व कंपाउंड आदी विकासकामांचे उदघाटन व लोकार्पण करण्यात आले.

रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, 30 वर्षात रामराजेंनी फलटणचे पाणी बारामतीला विकले, लाल दिव्यासाठी फलटणच्या जनतेला बारामतीत गहाण ठेवले त्यांनी देवेंद्र फडणवीस व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कामाचे श्रेय घेऊ नये. ज्या आमदाराला मतदार संघाला निधी किती आला हे माहित नसते हे तालुक्याचे दुर्दैव म्हणावे लागेल आणि असल्या नंदीबैलाला घरी पाठवण्याची वेळ आता आली आहे. येत्या विधानसभेत फलटण ची सुज्ञ जनता ते काम चोख करेल यात शंका वाटत नाही.