रामराजेंच्या ओपन चॅलेंजवर रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी दिली प्रतिक्रिया; तयार आहे… म्हणत केला मोठा गौप्यस्फोट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी शनिवारी एका कार्यक्रमात रणजितसिंह निंबाळकर यांच्याबाबतच्या तक्रारींचा पाढा वाचला. तसेच त्यांना दम असेल तर अपक्ष लढण्याचं ओपन चॅलेंज देखील दिले. त्यांचे चॅलेंज रणजितसिंह निंबाळकर यांनी स्वीकारत आज मोठा गौप्यस्फोट केला आहे. फलटण, कोरेगाव विधानसभा आम्ही जर वरिष्ठांनी सांगितलं तर लढू आणि जिंकू देखील. मात्र, रामराजे नाईक निंबाळकर यांनी शरद पवारांची भेट घेतली असल्याचं रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटलं आहे.

रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी आज फलटणमध्ये रेल्वेच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला. यावेळी रणजित सिह नाईक निंबाळकर यांनी गौप्यस्फोट केल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

रामराजे निंबाळकर नेमकं काय म्हणाले?

कार्यकर्ता हा माझ्या आयुष्याचा केंद्रबिंदू आहे. मतदारसंघातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. भाजपाचा आधार घेऊन माझ्या कार्यकर्त्यांना अडचणीत आणण्याचा, दबावाचा प्रयत्न करून खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात डांबले जात आहे. ही परिस्थिती आता सहन करण्यापलीकडे गेली आहे. पक्ष विसरा, तुमच्यात दम असेल तर समोरासमोर या अपक्ष लढू, असे खुले आव्हान आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधक माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिले.