पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची उघडीप दिली असून पावसाचा जोर ओसरला आहे. धरण पाणीसाठ्यात दोन दिवसांत दीड टीएमसीने वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा 16.48 टीएमसी इतका झाला असून तर सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत नवजाला सर्वाधिक 05 मिलीमीटर पाऊस झाला. तर कोयनानगर येथे 04 आणि महाबळेश्वरला 04 मिलीमीटरची नोंद झाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून कास, बामनोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वर यासह कांदाटी खोऱ्यात पडणाऱ्या पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे. एक जूनपासून आतापर्यंत कोयना येथे 526, नवजा 673 आणि महाबळेश्वरला 440 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. दोन दिवसात कोयना धरणात दीड टीएमसीने वाढ झाली आहे. सोमवारी सकाळपर्यंत धरणात 16.48 टीएमसी पाणीसाठा झाला असून 15.66 इतके टक्के धरणात पाणीसाठा आहे. धरणात 2 हजार 758 क्युसेक्सने पाण्याची आवक होत आहे.
Koyna Dam
Date : 24/06/2024
Time : 08:00 AM
Water level : 2046”06” (623.773m)
Dam Storage :
Gross : 16.48 TMC (15.66%)
Live : 11.36 TMC (11.34%)
Inflow : 2758 Cusecs.
Discharges
KDPH : 00 Cusecs.
Total Discharge in koyna River : 00 Cusecs
Rainfall in mm – (Daily/Cumulative)
Koyna – 04/526
Navaja – 05/673
Mahabaleshwar – 04/440