जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून अवकाळी पाऊस कोसळत आहे. काल सोमवारी अवकाळी पावसाने जिल्ह्यात चांगलेच नुकसान केले. कराड, पाटण तालुक्यात पावसामुळे घरांचे, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जिल्ह्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाच्या वतीने देण्यात आलेला आहे.

जिल्ह्यातील कराड तालुक्यास वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे सोमवारी दुपारी चांगलेच झोडपून काढले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सुसाट्याच्या वाऱ्यासह पावसाळा सुरुवात झाली. यामुळे तासवडे एमआयडीसी येथील बेघर वस्तीसह परिसरात असलेल्या घरावरील पत्रे उडून गेले. यामध्ये याइतजील परिसराचे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले तर पिके देखील भुईसपाट झाली आहेत. सध्या जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून अनेक भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे.

जिल्ह्यात मे महिन्याच्या मध्यावर पाऊस पडू लागल्यामुळे अजून पुढील पाच ते सहा दिवस अतिवृष्टीही होईल, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. आजपासून कराड, पाटण, महाबळेश्वर, खंडाळा या तालुक्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे ग्रामीण भागात खरीप हंगामपूर्व शेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे.