पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या तीन ते चार दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत होता. आज पुन्हा दमदार पावसाने सुरुवात केल्यामुळे जिल्ह्यातील धारण क्षेत्रातील पाणी साठ्यात वाढ होऊ लागली आहे. गुरूवारी सायंकाळपर्यंत नवजा येथे सर्वाधिक 55 मिलीमीटरची नोंद झाली असून कोयनेत 44 आणि महाबळेश्वरला 31 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. कोयना धरणात 45.16 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी अशी प्रमुख धरणे आहेत. या धरणांची पाणीसाठवण क्षमता 148 टीएमसीवर गेली आहे.
जिल्ह्यातील प्रमुख असलेल्या सहा अशा धरणावर अनेक गावांच्या पाणी तसेच सिंचन योजनाही अवलंबून आहेत.सध्या छोटी धरणे भरु लागली आहेत. मात्र, मोठी धरणे भरण्यासाठी मुसळधार पावसाची अजून आवश्यकता आहे. पावसाने उघडीप दिली असली तरी आतापर्यंत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिके चांगली आलेली आहेत.
चार दिवसांपूर्वी तर पश्चिम भागातील कोयना, नवजा, कास, बामणोली, तापोळासह महाबळेश्वरमध्ये जोरदार पाऊस झाला मात्र, त्यानंतर उघडझाप सुरू होती. मात्र, बुधवारपासून पुन्हा पाऊस वाढला आहे. तसेच धरणक्षेत्रातही पाऊस होत असल्याने साठा वाढू लागला आहे. एक जूनपासून आतापर्यंत कोयनानगरला 2 हजार 131 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. नवजाला 2 हजार 509 मिलीमीटर पाऊस पडला आहे.
Koyna Dam
Date: 18/07/2024
Time: 05:00 PM
Water level: 2101’08” (640.588m)
Dam Storage:
Gross: 45.16 TMC (42.91%)
Live: 40.04 TMC (39.99%)
Inflow : 20,412 Cusecs.
Discharges
KDPH: 00 Cusecs.
Total Discharge in koyna River: 00 Cusecs
Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 44/2131
Navaja- 55/2509
Mahabaleshwar- 31/1906