सातारा प्रतिनिधी | सातारा शहर परिसरात पोलिसांनी ठिकठिकाणच्या 12 जुगार अड्ड्यांवर छापे टाकून 13 जणांवर गुन्हे दाखल केले. पोलिसांनी या कारवाईत रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असा सुमारे 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
वैभव विश्वनाथ कोल्हे (वय 22, प्रतापसिंहनगर), आशिष अशोक नेवसे (32, रा. सैदापूर, ता. सातारा), अमितकुमार विश्रांत माने (45, रा. गिरवाडी, ता. पाटण), सुभाष उत्तम घाडगे (36, रा. दौलतनगर), नसिम गुलाब शेख (40, रा. आकाशवाणी झोपडपट्टी), दर्शन मोतीराम कसबे (26, रा. चंदननगर), राजू शंकर चव्हाण (27, रा. संभाजीनगर), दीपक गजानन देशमुख (30, रा. शनिवार पेठ), गुरुप्रसाद शेखर साठे (46, रा. शुक्रवार पेठ), मंगेश अरुण नाईकनवरे (23, रा. सातारा), रामदास श्रीरंग यादव (42, रा. चंदननगर), हर्षदराज शिवाजीराव कुमकर (52, रा. सातारा), धनाजी दत्तात्रय खोपडे (58, रा. खोजेवाडी, ता.सातारा) यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.
सातारा शहर पोलिसांनी या सर्व कारवाया देगाव फाटा, गोडोली, एमआयडीसी, सिव्हिल गेट समोर, कमानी हौद परिसर, गुरुवार परज, एसटी स्टॅन्ड परिसर या ठिकाणी केल्या आहेत. रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.