सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात उत्साह पूर्ण वातावरणात सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात पहिल्या टप्प्यात संथगतीने मतदान झाले. दरम्यान, जिल्ह्यात मतदान केंद्र परिसर व मतदार संघात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे. या पार्श्वभूमीवर सातारा शहरातील प्रतापसिंहनगर या ठिकाणी देखील सातारा पोलिसांकडून ड्रोनद्वारे मतदानाच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.
मतदान प्रक्रिया पार जिल्ह्यातील ३ हजार १६५ मतदान केंद्रांवरून सुरू झाली आहे. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत आहे. मतदानासाठी सेक्टर ऑफिसर ४३६, केंद्राध्यक्ष ३ हजार ९५६ व इतर कर्मचारी ११ हजार ८६९ असे एकूण १६ हजार २६१ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यातील ८ मतदारसंघांत १०९ जण निवडणूक रिंगणात आहेत. जिल्ह्यात १३ लाख ३७ हजार ०७२ पुरुष तर १३ लाख ०५ हजार ६०८ महिला मतदार आहेत. तृतीयपंथीयांची संख्या ११४ आहे. असे २६ लाख ४२ हजार ७९४ मतदार आज बुधवारी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
सकाळी सात ते सायंकाळी सहा यावेळेत मतदान प्रक्रिया पार पाडत असून कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी ३०९७ पोलिस कॉन्स्टेबल, तसेच २९४० होमगार्ड यांची नेमणूक करण्यात आली आहे. केंद्रीय निमलष्करी दलाच्या आठ, तर राज्य राखीव दलाची एक तुकडी नेमण्यात आली आहे. संवेदनशील ४८ मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही वॉच राहणार असून, गैरप्रकार टाळण्यासाठी विशेष पथकांचाही वॉच ठेवण्यात आलेला आहे.
सकाळी 9 वाजेपर्यंत या मतदार संघात झाले ‘इतले’ टक्के मतदान
सकाळी सात वाजल्यापासून न्यू वाजेपर्यंत सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात चांगले मतदान झाले. यामध्ये २५५ फलटण : 4.29, २५६ वाई : 4.92, २५७ कोरेगाव : 6.93, २५८ माण : 3.8, २५९ कराड उत्तर : 4.84, २६० कराड दक्षिण : 5.63, २६१ पाटण : 4.68, २६२ सातारा : 6.15