सातारा प्रतिनिधी । लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे स्टेशनचे गार्डनमध्ये एका अनोळखी इसमास अज्ञात आरोपीने त्याचे डोक्यात फरशी व सिमेंट काँक्रिटचा ब्लॉक डोक्यात मारुन त्याचा खून केल्याची घटना दि. १५ रोजी घडली होती. या प्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेतील आरोपींना सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आज अटक केली. गंभीर व क्लीष्ट खुनाचा गुन्हा कोणतेही धागेदोरे नसताना पोलिसांनी ४ दिवसात खुनाचा गुन्हा उघड करुन आरोपीस जेदबंद केले.
मनोज तिवारी (वय 25, मुळा रा. इलाहाबाद, उत्तरप्रदेश/ सध्या रा. कुर्ला कलिना एअरपोर्ट जवळ मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा खूनाचा असल्याने पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख पोलीस व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांनी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना गुन्हा उघड करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे अरुण देवकर पोलीस निरीक्षक यांच्या अधिपत्त्याखाली सपोनि रोहित फार्णे व पोउनि अमित पाटील यांचे एक विशेष पथक तयार करुन तपासकामी लोणंद पोलीस ठाण्यास पाठविण्यात आले होते.
लोणंदमधील खुनाचे गूढ उकलले; कोणतेही धागेदोरे नसताना 4 दिवसात आरोपीस अटक pic.twitter.com/FdrZZpECe4
— santosh gurav (@santosh29590931) July 23, 2024
सदर पथकाने लोणंद येथे जावून गुन्हयाच्या घटनास्थळास भेट दिली. तेथील परिस्थितीची माहिती घेतली. पोलीस निरीक्षक श्री अरुण देवकर यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे गुन्हयाचा तपास तांत्रिक पध्दत, सीसीटीव्ही फुटेज, गोपनिय बातमीदार तसेच साखळी तपास पध्दतीचा अवलंब करुन ४ दिवस अहोरात्र लोणंद व फलटण परिसरात कसोशिने तपास केला असून सदरचा गुन्हा परराज्यातील आरोपी मनोज तिवारी यास फलटण येथून ताब्यात घेण्यात आले आहे. तपासामध्ये सदरचा गुन्हा आरोपीने केला असल्याचे सांगितले आहे. मयत इसम व आरोपी हे दोघे मुंबई येथे एका केटरर्सकडे कामास होते, त्याठिकाणी सुमारे ६ महिण्यापुर्वी दोघांच्यामध्ये पैशाच्या देवाण-घेवाणीच्या कारणावरुन वाद झाले होते.
त्या वादातूनच सदर आरोपी याने मयत इसमाचा खून केला असल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले असून सदर आरोपी यास पुढील कारवाईकामी लोणंद पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर गुन्हा परराज्यातील एका इसमाने केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी हा उत्तरप्रदेशातील मुळ रहिवासी असल्याने मयत याची अद्याप ओळख पटली नव्हती. आरोपी व मयत यांचा कोणत्याही प्रकारे राहण्याचा अगर वावरण्याचा ठावठिकाणा नव्हता तसेच मयताच्या जवळ ओळख पटण्याचे कोणतेही दस्तऐवज मिळुन न आल्याने सदर खूनाचा गुन्हा उघड करण्याचे मोठे आव्हान पोलीस यंत्रनेसमोर होते.
सदर कारवाईमध्ये श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा, यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फाणे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, विश्वास शिंगाडे अंमलदार अतिष घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे अमित माने, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, स्वप्निल कुंभार, प्रविण कांबळे, अरुण पाटील, ओंकार यादव, मोहन पवार, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, वैभव सावंत, शिवाजी गुरव, विजय निकम, फलटण शहर पोलीस ठाण्याचे अंमलदार सचिन फाळके व ऋषीकेश खरात यांनी सहभाग घेतला असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री समीर शेख, श्रीमती आँचल दलाल यांनी अभिनंदन केले आहे.