सातारा प्रतिनिधी | पोलिस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या आदेशान्वये सातारा जिल्हयात दि. १० जानेवारी ते ११ जानेवारी रोजी कॉबींग ऑपरेशन व नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधितांना अटक केली.
१) अमिर सलीम शेख रा.मु.पो. वनवासवाडी ता. जि. सातारा, २) अमिर इम्तीयाज मुजावर रा. गोरखपुर पिरवाडी ता. जि. सातारा, ३) अलिम नजीर शेख रा. गोरखपुर पिरवाडी ता.जि. सातारा, ४) यश सुभाष साळुंखे (रा.आय.टी.आय रोड मोळाचा ओढा सातारा), ५) अभिषेक उर्फ अबू राजू भिसे (रा. काळे वस्ती)
पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी दिलेल्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व अमित पाटील यांचे अधिपत्याखाली पथके तयार करण्यात आली. तसेच त्यांना गुन्हे प्रतिबंध अनुशंगाने सातारा शहरात पेट्रोलिंग करण्याच्या सुचना देण्यात आल्या.
त्यानुसार पथके सातारा शहरात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना माहिती प्राप्त झाली की, राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ चे खिंडवाडी ते शिवराज फाटा जाणारे सव्हिस रोडवरील वनविभागाचे झाडीमध्ये काही इसम हत्यारानिशी जमले असून ते रोड रॉबरी करण्याच्या तयारीमध्ये आहेत. त्यानंतर पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी पेट्रालिंग करणाऱ्या पथकास नमुद ठिकाणी जावून कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
पथके तात्काळ त्या ठिकाणी रवाना झाली, नमुद इसमांना पोलीसांची चाहूल लागताच ते अंधाराचा व झाडाझुडूपांचा फायदा घेवून पळून जावू लागले. पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी नमुद इसमांचा अंधारात झाडाझुडूपात पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले असता सदरचे इसम पोलीस अभिलेखावरील आरोपी १) अमिर सलीम शेख रा.मु.पो. वनवासवाडी ता. जि. सातारा, २) अमिर इम्तीयाज मुजावर रा. गोरखपुर पिरवाडी ता. जि. सातारा, ३) अलिम नजीर शेख रा. गोरखपुर पिरवाडी ता.जि. सातारा, ४) यश सुभाष साळुंखे रा.आय.टी.आय रोड मोळाचा ओढा सातारा, ५) अभिषेक उर्फ अबू राजू भिसे रा. काळे वस्ती निकीबंटस हॉटेलचे पाठीमागे मोळाचा ओढा सातारा असल्याचे आढळून आले.
त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचेकडे २ देशी बनावटीची पिस्टल, ४ जिवंत काडतुसे, २ सुरे व ६ मोबाईल हॅन्डसेट असा एकूण ३ लाख ३ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. नमुद इसमांना ठिकाणी कशासाठी आला होता हे विचारले असता त्यांनी रोड रॉबरी करण्याकरीता येथे आलो असल्याचे सांगीतल्याने त्यांचे विरुध्द सातारा शहर पोलीस ठाणे गु.र.नं.३३/२०२४ भादविक ३९९, ४०२ सह आर्म अॅक्ट ३, २५ अन्वये गुन्हा नोंद केला.
पोलिस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, अमित पाटील, विश्वास शिंगाडे, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, अरुण पाटील, अमित माने, स्वप्नील कुंभार, अमित सपकाळ, ओंकार यादव, मोहन पवार, विक्रम पिसाळ, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, वैभव सावंत, मयुर देशमुख, शिवाजी गुरव यांनी सदरची कारवाई केलेली असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.