विद्यानगरमध्ये मद्यधुंद युवकांची कॉलेजसमोर हुल्लडबाजी; पोलिसांनी पाठलाग करून दारूच्या बाटल्यासह पकडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सध्या कराडच्या महाविद्यालय परिसरात युवकांकडून हुल्लडबाजी करण्याचे प्रकार चांगलेच वाढले आहेत. दरम्यान, काही मद्यधुंद युवकांनी विद्यानगर येथील एका विद्यालयाच्या आवारात कार घालून हुल्लडबाजी केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. पोलिस पोहोचल्यानंतर त्यांनी तेथून कारसह पळ काढला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून या युवकांना ताब्यात घेतले.

याबाबत अधिक माहिती अशी की, विद्यानगर परिसरात मंगळवारी दुपारी काही हुल्लडबाज युवकांनी मद्यधुंद अवस्थेत ड्रायव्हिंग करत विद्यालयाच्या गेटमधून आत गाडी नेऊन स्टंटबाजी केली. विद्यालयाच्या सुरक्षारक्षकाने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला न जुमानता युवकांनी गाडी विद्यालयाच्या प्रांगणात नेत विद्यार्थिनींसमोर हुल्लडबाजी केली. या घटनेमउळे एकाच गोंधळ उडाला. याची माहिती मिळताच पोलिसांनी जीपमधून तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली. पोलिसांना पाहताच हुल्लडबाज युवकांनी तेथून कारसह पळ काढला. ते विद्यानगरमधून बनवडीच्या दिशेने पळाले. दरम्यान, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करीत बनवडीत त्यांच्या गाडीसमोर जीप आडवी लावली.

पोलिसांनी गाडी आडवी मारताच युवकांनी तेथून त्यांच्या गाडीचा रिव्हर्स घेत कोपर्डे हवेलीच्या दिशेने पळ काढला. त्यावेळी पोलिसांनी पुन्हा पाठलाग करत कोपर्डे हवेलीत त्यांना अडवले. मात्र, कारमधील सात तरुणांपैकी पाच तरुण नजीकच्या शेतातून पळून जाण्यास यशस्वी झाले. दरम्यान, दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या कारची पोलिसांनी झाडाझडती घेतली असता त्यामध्ये दारूच्या बाटल्या व चिप्सचे पुडे आढळून आले.

दरम्यान, पोलिसांनी त्या दोन हुल्लडबाज तरुणांना ताब्यात घेतले असून फरार झालेल्या तरुणांचा शोध सुरू केला आहे. घटनास्थळी अमोल कृष्णत फल्ले, धनचंद्र प्रमोद पाटील, निर्भया पथकाच्या दीपा पाटील, विजय बंडू पवारयांच्याकडून ही मंगळवारी कारवाई करण्यात आली.