पर्यटनस्थळांवर हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर पोलिसांची कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी होत असल्याने पर्यटनस्थळांकर बंदी घालण्यात आली असताना देखील पाटण तालुक्यातील पर्यटनस्थळी पर्यटक हुल्लडबाजी, दंगामस्ती व कायद्याचे उल्लंघन करत असल्याचे दिसत आहे. अशा हुल्लडबाजी करणाऱ्यावर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात आली.

सातारा जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यात कोणत्याही प्रकारचा अनर्थ घडू नये म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पाटण तालुक्यातील ओझर्डे, नवजा, सडा वाघापूर धबधबा व तालुक्यांतील इतर पर्यटनस्थळे पाहावयास तात्पुरती बंदी घातली आहे. हे आदेश डावलून पर्यटक हुल्लडबाजी करत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पाटण तालुक्यात कुठेही हुल्लडबाजी करताना अनुचित प्रकार घडू नये म्हणून पाटणचे उपविभागीय अधिकारी सुनील गाढे, तहसीलदार अनंत गुरव यांनी संबंधित पोलीस यंत्रणेला अशा हुल्लडबाज पर्यटकांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पाटणचे पोलीस निरीक्षक अवनाश कवठेकर व कोयनानगरचे पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सडा काघापूर येथे उलटा धबधबा व नवजा येथील ओझर्डे धबधबा तसेच इतर पर्यटनस्थळे पाहण्यासाठी आलेल्यांकडून कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून तेथे ये-जा करणाऱ्या अनेकांवर ड्रंक अँड ड्राईव्ह तसेच पर्यटनाला बंदी असतानादेखील या ठिकाणी आल्याने त्यांच्याकर कडक कारवाई करण्यात आली आहे.

यावेळी सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सदगर, सहायक पोलीस हकालदार ए. एम. गलांडे, वाहतूक पोलीस हनुमंत नलकडे, राजेंद्र मोहिते, पोलीस हवालदार एस. डी. काशिद, होमगार्ड किशोर मोहिते यांच्यासह पोलीस कर्मचारी, होमगार्ड या कारवाईत सहभागी झाले होते.