साताऱ्यातील शाहुपूरीत पाऊण लाखाचे पिस्टल जप्त, DB पथकाने संशयिताला ठोकल्या बेड्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | समर्थ मंदिर चौक ते बोगदा जाणाऱ्या रस्त्यावरील हॉटेल अजिंक्यतारा जवळ शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचून एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता पॅन्टचे कमरेस देशी बनावटीचे पिस्टल आढळून आले. पिस्टलची किंमत ७५ हजार रूपये आहे. पिस्टल जप्त करून धीरज विजय शेळके (रा. जकातवाडी ता. सातारा) यास अटक केली.

धीरज शेळके नावाचा इसम समर्थ मंदिर चौक ते बोगदा जाणारे रोडवर हॉटेल अजिंक्यतारा जवळ संशयितरित्या फिरत असून त्याच्याजवळ पिस्टल असल्याची माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली. त्यांनी डीबी पथकाला कारवाईची सूचना केली.

डीबी पथकाने संबंधित परिसरात सापळा रचला. काही वेळाने एक संशयीत त्याठिकाणी आला. पोलित्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करु लागला. मात्र , पोलिसांनी त्याला शिताफीने पकडून ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता कमरेस एक देशी बनावटीचे पिस्टल मिळून आले. पोलिसांनी ते पिस्टल जप्त करून संशयितास अटक केली आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ए. ए. बागवान करीत आहेत.

पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, डीवायएसपी किरणकुमार सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, जोतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, सुमित मोरे, सुनिल भोसले यांनी ही कारवाई केली.