ई-पीक नोंदीसाठी पाटणचे तहसीलदार अधिकाऱ्यांसह थेट शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावर

0
39

पाटण प्रतिनिधी | ‘माझी शेती माझा पेरा, मीच नोंदवणार माझा पीकपेरा’ हे बीद्रवाक्य असलेल्या महाराष्ट्र शासनाने महसूल विभागामार्फत ई पीक पाहणी प्रकल्प राज्यभर सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील ई पीक नोंदीबाबत मार्गदर्शन व प्रोत्साहीत करण्यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव यांनी नुकतीच इतर कृषी विभागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत शेतकऱ्यांच्या थेट शेताच्या बांधावर जाऊन नुकतीच ई-पीक नोंदीबाबत माहिती घेतली.

‘माझी शेती माझा पेरा, मीच नोंदवणार माझा पीकपेरा’ हे बीद्रवाक्य असलेल्या महाराष्ट्र शासनाने महसूल विभागामार्फत ई पीक पाहणी प्रकल्प राज्यभर सुरू आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी शेतातील विविध पिकांच्या नोंदी १५ जानेवारीपर्यंत स्वतःच्या मोबाईलद्वारे ई पीक पाहणी अॅपच्या माध्यमातून करण्यासाठी महसूल विभागाचे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी मार्गदर्शन करत आहेत. पाटण तालुक्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांच्या ई पीक पाहणी नोंदी होण्यासाठी शनिवार, रविवार सुट्टीचा दिवस असतानाही प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्याच्या थेट शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. यामुळे तालुक्यातील ई पीक नोंदीबाबतची जागृती मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदी करावी : तहसीलदार अनंत गुरव

पाटण तालुक्यात ई पीक नोंदीचे काम केले जात आहे. दरम्यान, ई-पीक नोंदीसाठी गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, स्वस्त धान्य् दुकानदार, रोजगार सेवक आदींनी शेतकऱ्यांना मदत करावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले असल्याची प्रतिक्रिया पाटणचे तहसीलदार अनंत गुरव यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली आहे.

संपूर्ण पीक पाहणी

शेतकऱ्यांनी स्वतःच्या किंवा इतरांच्या मोबाईलवरून शेतातील रब्बी हंगामातील पिकांची ई पीक पाहणी करून आपला पीक पेरा करावा. ही नोंद स्वयंप्रमाणित मानली जाणार आहे. ई पीक पाहणीमध्ये मिश्र पिकामध्ये मुख्य पिकासह तीन घटक पिकांची नोंद करता येते. या अॅपद्वारे संपूर्ण गावातील पीक पाहणी पाहता येऊ शकते.