पाटण तालुक्यात पावसाची उघडीप; कोयना धरणात ‘इतका’ झाला पाणीसाठा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात पावसाचा जोर मंदावला असून, तालुक्याच्या पूर्व भागात आज दिवसभर पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे, तर जलाशयात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली असल्याने शनिवारी सकाळी नऊ वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फुटावर खाली आणण्यात आले असून कोयना धरणात एकूण पाणीसाठा १०४.२८ टीएमसी झाला आहे.

धरणाच्या सांडव्यावरून सध्या नऊ हजार २१४ क्युसेक आणि पायथा वीजगृहातून दोन हजार १०० क्युसेक असा एकूण ११ हजार ३१४ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येत आहे. विसर्ग कमी केल्याने नदीच्या पाणीपातळीत घट झाली आहे. धरणाचा एकूण पाणीसाठा १०४.०६ टीएमसी झाला आहे. बुधवारी रात्री उशिरा धरणाचे सहा वक्र दरवाजे साडेपाच फुटांपर्यंत उचलून सांडव्यावरून कोयना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता.

पावसाचा जोर कमी झाल्याने शुक्रवारी दुपारी दोन वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे साडेपाच फुटांवरून साडेचार फुटांवर खाली आणले होते. ते रात्री १० वाजता साडेचार फुटावरून साडेतीन फुटांपर्यंत कमी करून धरणाच्या सांडव्यावरून ३१ हजार ८२१ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. पुन्हा पाण्याची आवक कमी झाल्याने आज सकाळी सहा वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे साडेतीन फुटांवरून दोन फुटांपर्यंत व नऊ वाजता एक फुटावर आणले आहेत. जलाशयात प्रतिसेकंद २१ हजार ८०७ क्युसेक पाण्याची आवक होत आहे.

सध्या धरणाच्या सांडव्यावरून नऊ हजार २१४ क्युसेक आणि पायथा वीजगृहातून दोन हजार १०० क्युसेक असा एकूण ११ हजार ३१४ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येत आहे. पाऊस कमी झाल्याने आवक कमी झाली. त्यामुळे पाणीसाठा नियंत्रणात आला आहे.

Koyna Dam
Date: 08/09/2024
Time: 08:00 AM
Water level: 2162’09” (659.206m)

Dam Storage:
Gross: 104.28 TMC (99.07%)
Live: 99.16 TMC (99.03%)

Inflow : 17,300 Cusecs.

Discharges
Radial Gate: 9,214 Cusecs.
KDPH: 2,100 Cusecs.

Total Discharge in koyna River: 11,314 Cusecs

Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 8/5217
Navaja- 37/6297
Mahabaleshwar- 29/5999