पाटण प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील मेष्टेवाडी येथील घरातून सुमारे १ लाख १७ हजार किमतीचे सोन्याचे गंठण अज्ञात चोट्याने चोरून नेले होते. या प्रकरणी पाटण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अधिक तपास करत चोरट्यास अटक केली. तसेच त्याच्याकडून १ लाख १७ हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अमोल किसन शिंदे (वय ३१, रा. कारवट ता.पाटण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि. ०४/०३/२०२४ रोजी मेष्टेवाडी ता. पाटण येथिल फिर्यादी यांनी त्याचे घरातील कपाटातुन १ लाख १७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरी झालेबाबत माहिती दिली. यानंतर पाटण पोलीस ठाणेस अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा हा ग्रामीण भागात घडलेला असलेने सदर ठिकाणी सीसीटीव्ही अगर इतर कोणतेही तांत्रिक पुरावे नव्हते. सदर गुन्हयाचे अनुशंगाने तपास करीत असताना पाटण पोलीस ठाणे नेमणुकीचे स.फौ. एस. बी. राऊत, पो. हवा. वैभव पुजारी, पो. कॉ. उमेश मोरे यांनी गोपनिय बातमीदाराच्या मदतीने गोपनिय माहितीच्या आधारे चोरट्याचा शोध घेतला. यावेळी त्यांना सदर गुन्हा हा अमोल किसन शिंदे वय ३१ वर्षे रा. कारवट ता. पाटण याने केला असलेबाबत माहिती मिळाली.
त्यानंतर त्यांनी सापळा रचून संबंधित चोरट्यास गुरुवारी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. व चोरीस गेलेले १ लाख १७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण पोलिसांनी हस्तगत करीत सदरचा गुन्हा उघडकीस आणला. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी, पाटण विभाग सविता गर्जे, पोलीस निरीक्षक, पाटण पोलीस ठाणे श्री. अविनाश कवठेकर, सहा.पोलीस निरीक्षक, पाटण पोलीस ठाणे श्री.संदीप कामत यांचे मार्गदर्शनाखाली पाटण पोलिसांच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक श्री. कवठेकर यांचे मार्गदर्शनाखाली सफौ.एस.बी. राऊत हे करीत आहेत.