पोलिसांची हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाई; पाटणमध्ये 11 गुन्हे दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | पाटण तालुक्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पाण्याचे उंचावरून पडणारे धबधबे, ओढे-नाले आणि धरणामुळे मनमोहक हिरवाई पाहण्याचा अनुभव पर्यटकांना मिळतो. त्यामुळे दर पावसाळ्यात हजारो पर्यटक पाटण तालुक्यात चिंब भिजण्याचा आनंद घेण्यासाठी हजेरी लावतात. त्यातच हुल्लडबाज, मद्यपी, पर्यटकांची संख्या सार्वधिक असते. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्याते धबधब्यावर सहलीसाठी येणाऱ्या हुल्लडबाज पर्यटकांना रोखण्यासाठी पाटण पोलिस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. प्रशासनाने अशा ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला असून, पोलिसांनी ११ केसेस दाखल करून सहा हजारांचा दंड वसूल केला आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, धरणातील पाणीसाठा नियंत्रणासाठी पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यातच हुल्लडबाज पर्यटकांना रोखण्यासाठी तालुक्यात जागोजागी नाकाबंदी करण्यात येणार आहे.

दारूसह अमली पदार्थांना घाटपरिसरात सक्त बंदी असून, पर्यटकांच्या वाहनांचीही कसून तपासणी केली जाणार असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. शिवाय पेट्रोलिंग पथक स्थापन करण्यात आले आहे. हे पथक पर्यटनस्थळावर मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्यावर कारवाई करणार आहे.

सदावघापुर येथील उलट धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची ये-जा असते. या ठिकाणी दुर्घटना घडू नये म्हणून बंदोबस्त नेमण्यात आला आहे. या बंदोबस्ता दरम्यान कर्तव्यावरील अधिकारी व अंमलदार यांनी दहा केसेस दाखल केल्या असून, त्यांच्याकडून सहा हजार रुपये दंड वसूल केला आहे.