पाटण विधानसभेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज; 3 लाख 6,407 नोंदणीकृत आहेत मतदार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । पाटण विधानसभा निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. पाटण विधानसभा मतदारसंघात यापूर्वी असलेल्या ४०९ मतदान केंद्रात नवीन १५ मतदान केंद्र तयार करण्यात आली असल्याने एकूण ४२४ मतदान केंद्र असतील. मतदारसंघात ३ लाख ६ हजार ४०७ नोंदणीकृत मतदार आहेत. आगामी निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार अनंत गुरव यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अनंत गुरव यांनी सांगितले की, ३० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीनुसार १० लाख ५५ हजार ३०८ पुरुष, १ लाख ५१ हजार माहिला, तृतीयपंथी तीन अशी ३ लाख ६ हजार ४०७ मतदार संख्या आहे. यामध्ये २ हजार ८५२ अपंग मतदार संख्या असन ८५ वर्षांवरील वृध्द मतदारांची संख्या ४ त्यांनी हजार १७६ आहे. जे ८५ वर्षावरील वृद्ध तसेच दिव्यांग मतदारांच्या घरी जाऊन टपाली मतदान करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात येतील.

प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी विधानसभा मतदारसंघांत शहरी भागातील ११ व ग्रामीण भागातील ४१३ अशी एकूण ४२४ मतदान केंद्र असतील. यामध्ये शून्य ते ३०० मतदार संख्या असलेली ३८ केंद्र, ३०१ ते ११००- ३२८, ११०१ ते १२००- २८, १२०१ ते १३००- २४, १३०१ ते १४०० व १४०१ ते १५०० मतदार संख्या असलेले एक अशी ४२४ मतदान केंद्रावरील मतदार संख्या आहे. मतदार संघात आदर्श मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात येणार आहे.

मतदार संघात आरल चाफोली), विठ्ठलवाडी, हुंबरपेढा (जोतिबाचीवाडी), कोतावडेवाडी, पाटण (दोनकेंद्र), चोपडी, जंगमवाडी (धजगांव), माईंगडेवाडी, सावंतवाडी (जिंती), भालेकरवाडी, नानाईवाडी- मस्करवाडी- भिलारवाडी, सतीचीवाडी, कातकरवाडी (मंद्रुळकोळे) व पाडळी केसे अशा नवीन पंधरा मतदान केंद्रांची निर्मिती केली आहे. ठिकाणात बदल असणारी नऊ व नावात बदल असलेली पाच केंद्र आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी ५८ झोनल व ४८ पोलीस सेक्टर अधिकारी असतील.