सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशापालन) संपुर्ण राज्यात कार्यान्वीत झालेली आहे. या योजनांची माहिती व फायदे जास्तीत जास्त लोकांना व्हावी, यासाठी मंडळाची माहिती देण्यासाठी दि. 21 फेब्रुवारी रोजी एक दिवसीय जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर मेळाव्यामध्ये शासनाचे कृषी विभाग, वन विभाग, पंचायत समिती, इत्यादी शासकीय कार्यलयांचा सहभाग राहणार आहे. मेळाव्याचे ठिकाण – मानेचीवाडी ता. पाटण जि.सातारा येथे सकाळी दहा वाजले पासून सूरू राहणार आहे. सदर मेळाव्यास प्रवेश निशुल्क राहील. इच्छुकांचे नांव नोदणी करून, त्यांचे फॉर्म भरून घेणेत येतील. तरी सदर शिबीरात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत करण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत महिला युवक-युवती, सुशिक्षीत बेरोजगार, आदिवासी, जेष्ठ नागरीक, अनुसुचित जाती व जमाती, इतर मागासवर्ग, भटक्या विमुक्त जमाती, स्वांतत्र्य सैनिक, माजी सैनिक, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, स्वयंम् सहाय्यता युवा गट, व्यक्ति, शेतकरी, शेतमजूर, भूमिहिन, पारंपारीक कारागीर इत्यादी समाजातील सर्वच घटकांना मध योजनेचा लाभ देणेत येतो. याशिवाय महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री कौशल्य योजना इत्यादी योजना राबिवणेत येतात. सदर योजनेअंतर्गत उद्योजकांना विविध उद्योग उभारणेसाठी अर्थ सहाय्य देणेत येते. तसेच अनुदानाचा लाभ देणेत येतो. मध योजनेअंर्तगत लाभ घेवू इच्छिणा-या व्यक्तिनां विनाशुल्क निवासी प्रशिक्षण देणेची व्यवस्था मंडळामार्फत करण्यात येते.