सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हातील गेल्या काही दिवसांपासून गंभीर स्वरुपाच्या गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. सातारा जिल्ह्यात असलेल्या फलटण तालुक्यातील वीडणी गावामध्ये अंधश्रद्धेतून एका महिलेची हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना मागील महिन्यात घडली आहे. त्यातील आरोपीचा पोलिसांकडून अजूनही शोधच घेतला जात आहे. अशा प्रकरणात परिस्थितीजन्य शास्त्रीय पुरावे संकलनासाठी प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे (फॉरेन्सिक) एक पथक कार्यरत आहे.
सातारा जिल्ह्यात गुन्हा घडलेल्या घटनस्थळी पोहोचण्यासाठी पथकाकडून एक फॉरेन्सिक व्हॅनचा वापर केला जातो. वेळेप्रसंगी पोलिसांच्या वाहनांमध्येही चमू मार्गस्थ होतो. वाढती लोकसंख्या व गुन्हे पाहाता आणखी एका नव्या वाहनांची या पथकाला गरज भासतेय. मात्र, सातारा जिल्ह्यात अकरा तालुके असून या अकरा तालुक्यात एकच फॉरेन्सिक व्हॅन आहे.
सत्राला जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटना वाढत असून यात गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांच्या देखील समावेष आहे. या गुन्ह्याची उकल करण्यासाठी फॉरेन्सिक तपासाची पथके गुन्ह्यांच्या ठिकाणांहून पुरावे गोळा करतात. त्या पुराव्यांचे विश्लेषण करून अहवाल पोलिसांकडे पाठवितात. हा अहवाल दोषारोपपत्रासोबत तपासी पोलिस अधिकारी न्यायालयात सादर करत असतात. हे न्यायालयीन खटल्यांमध्ये एम महत्त्वाचे दस्तऐवज मानले जाते. फॉरेन्सिक शास्त्रज्ञ रक्त, केस आणि कपडे, बोटांचे ठसे, भौतिक पुराव्यांवरसुद्धा क्राइमस्थळावर लक्ष केंद्रित करतात.
घटनास्थळाहून संकलित केलेले नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी अनेकदा पोलिसांनी दिशा मिळत असते. त्यामुळे या विभागाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. तसेच सातारा जिल्ह्यात सातारा, कराड, माण, खटाव, वाई, खंडाळा, महाबळेश्वर, कोरेगाव, जावळी, पाटण, फलटण ही अकरा तालुके आहेत. जिल्ह्याचा विस्तार मोठा आहे. त्यामुळे फॉरेन्सिक व्हॅनची संख्या वाढविण्याची गरज आहे.
राज्यातील विविध भागात 256 मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन होणार कार्यान्वित
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने नवीन काही कायदे तयार केलेत. ज्याच्यामध्ये पुरावे कसे गोळा करावेत यासंदर्भात काही नियम ठरवलेले आहेत. पुरावे योग्य पद्धतीनं कसे सुरक्षित ठेवावेत, यासाठी महाराष्ट्र सरकारने मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन तयार केलीय. देशात महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे की, ज्याने मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आणलीय. महाराष्ट्रात 21 व्हॅन या आजपासून कार्यरत होणार आहेत. तर महाराष्ट्र राज्यात आगामी काळात राज्यातील विविध भागात 256 मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आणणार असल्याचे नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात म्हंटले आहे. विशेष म्हणजे या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये विविध प्रकारचे साहित्य अन् फॉरेन्सिक तज्ज्ञ असतील, त्यामुळे यामधून फॉरेन्सिक रिपोर्टसुद्धा येणार आहे.
जिल्ह्यात अजून 2 वाहनांची आवश्यकता…
सतरा जिल्ह्यात घडणाऱ्या गंभीर गुन्ह्याच्या घटनास्थळी पोहचण्यासाठी फॉरेन्सिक पथकाला काहीवेळा विलंब होतो. यामुळे संबंधितांना ताटकळत राहावे लागते, तसेच पोलिसांच्या तपासालाही गती येण्यास उशीर होतो. घटनास्थळी फॉरेन्सिकची पथकांना कमी वेळात पोहोचण्यासाठी शहर व जिल्ह्याचा विस्तार बघता अजून दोन फॉरेन्सिक वाहनांची गरज आहे. फॉरेन्सिकच्या पथकात रसायनशास्त्र फॉरेन्सिक सायन्स किंवा संबंधित क्षेत्रातील पदवीधारक व्यक्ती कार्यरत असतात. सातारा शहरासह जिल्ह्याचा वाढता विस्तार आणि गंभीर गुन्ह्यांच्या प्रमाणात होणारी वाढ बघता सातारा शहर व जिल्ह्यासाठी आणखी काही फॉरेन्सिक वाहनांची गरज भासते.
या गुन्ह्यांच्यावेळी होते मदत
विशेष करून खून, संशयास्पद मृत्यू, सशस्त्र दरोडे, लैंगिक अत्याचार, जबरी घरफोडी, प्राणघातक अपघातांसारख्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासाची दिशा निश्चितीसाठी पोलिसांकडून फॉरेन्सिकची मदत घेतली जाते. यावेळी पोलिस २ गुन्हेस्थळाच्या तपासासाठी या चमूला पाचारण करतात. यावेळी त्यांचे तांत्रिक-३ शास्त्रीय कौशल्याचा वापर करून पथकाकडून पुराव्यांचे संकलन व विश्लेषण केले जाते. यावरून पोलिसांना गुन्ह्याचा तपास करणे तसेच न्यायालयात पुरावे सादर करण्यास मदत होते.