पाटण प्रतिनिधी | मल्हारपेठ आठवडा बाजारास येताना चार वाजण्याच्या सुमारास गिरेवाडी (ता.पाटण) जवळ रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या चरीत गाडी घसरून ट्रॅक्टरखाली गेल्याने दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला. दिपक शंकर काटकर (वय ५५, रा. बेलदरे ता. कराड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बेलदरे गावाहून मल्हारपेठ बाजारास येताना गिरेवाडी गावाजवळ चौपदरी रस्त्याच्या मध्यमागी असणाऱ्या चरीत लुना गाडी (क्र.एम.एच. ५०/६०९८) घसरून खाली पडली. त्याचवेळी निसरे फाटावरून नवारस्त्याकडे व्यक्तीस जाणाऱ्या ट्रॅक्टर खाली सापडून दिपक काटकर यांचा जागीच मृत्यू झाला.
त्यांना दोन मुले, एक रेवाडी मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गाडी चरीतून घसरायला लागल्यामुळे लुना गाडीवर ६०९८) मागे बसलेल्या रामचंद्र डुबल याचवेळी (वय ५५) यांनी उडी मारली असून त्यांच्या गुडघ्याला मार लागला आहे. घटनेनंतर बेलदरे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी गोळा झाले.
अपघात निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे झाला असून संबंधित ठेकेदार कंपनी, दोन चाकी डॉपंग ट्रॅक्टरला दोन टेलर जोडलेल्या ट्रॅक्टरवर कार्यवाही होत नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला. पोलीसांनी आश्वासन दिल्यानंतर नातेवाईक व ग्रामस्थांनी दोन तासानंतर मृतदेह ताब्यात घेतला.
अपघात निकृष्ट रस्त्यामुळे झाला असून संबंधीत ठेकेदार कंपनीवर कार्यवाही झाल्याशिवाय आम्ही ग्रामस्थ गप्प बसणार नाही. तसेच ट्रॅक्टरला दोन डंपिंग टेलर असल्याने त्याच्यावर कार्यवाही होवून जास्तीजास्त मदत संबंधितांना मिळावी, अशी मागणी बेलदरे ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील यांनी केली.
कराड-पाटण सिमेंट रस्ता निकृष्ट दर्जाचा असल्याने अपघात झाला असून संबंधित एल. अॅन्ड टी. कंपनीवर कार्यवाही होत नाही तोपर्यंत मृत व्यक्तीस ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा कुटुंबिय व बेलदरे ग्रामस्थांनी घेतला. पोलीसांनी कार्यवाहीचे आश्वासन दिल्यानंतर सुमारे दोन ते तीन तासांनी ग्रामस्थांनी मृत व्यक्तीस ताब्यात घेतले.