स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; सोन्या चांदीच्या दागिण्यांसह पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा पोलीस ठाण्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाच्या वतीने नुकतीच एक धडक कारवाई करण्यात आली आहे. पथकाने आकाश अटक करीत त्याच्याकडून सोन्या चांदीच्या दागिण्यांसह पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

निलेश अंकुश काळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर यांनी दरोडा, जबरी चोरी, घरफोडी या सारखे गंभीर गुन्हे उघड करण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांना दिलेल्या होत्या व त्यानुसार पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांनी गुन्हयांचे गांभीर्य लक्षात घेत स्थानिक गुन्हे शाखेतील स.पो.नि. सुधीर पाटील यांच्या अधिपत्याखालील एक विशेष पथक तयार केले होते व त्यांना गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना देवून मार्गदर्शन केले होते.

दि. 15/10/2024 रोजी पोलीस अभिलेखावरील मालमत्तेचे गुन्हे करणारा आरोपी निलेश अंकुश काळे (वय 57 रा. देहूरोड पुणे) हा शिरवळ परिसरात येणार असलेबाबत पोलीस निरीक्षक श्री. अरूण देवकर यांना त्यांच्या गोपनिय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली, त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री. अरून देवकर यांनी सपोनि सुधीर पाटील यांना बातमीचा आशय सांगून त्यांचे पथकासह जावून सदर इसमास ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या त्याप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक श्री. सुधीर पाटील व त्यांच्या सोबतच्या टिमने शिरवळ येथे जावून सापळा रचला. आरोपीस पकडणकामी जात असताना त्याला त्याची चाहूल लागली असता तो पल्सर मोटार सायकल वरून पळून जावू लागला.

त्यावेळी पथकातील पोलीस अंमलदार मनोज जाधव व धिरज महाडीक यांनी त्याचा पाठलाग करून त्याचेवर झडप घातली त्यावेळी त्याने पळून जाण्यासाठी झटापट केली परंतु मनोज जाधव व धिरज महाडीक यांच्या तावडीतून तो सुटू शकला नाही. त्याचवेळी सपोनि सुधीर पाटील व इतर पोलीस अंमलदार यांनी त्याला पल्सर मोटार सायकलसह मोठ्या शिताफिने पकडून जेरबंद केले, सदर आरोपीस ताब्यात घेवून त्याचेकडे कौषल्यपुर्ण विचारपुस केली असता त्याने विविध ठिकाणी चोरी घरफोडी केले असले बाबत कबूली दिली आहे.

आरोपीकडून उघड झालेल्या गुन्ह्यात पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. सुधीर पाटील, रोहित फाणें, रूपाली मोरे, पोउनि. विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, पो.हवा. सचिन साळुंखे, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, सनी आवटे, मुनिर मुल्ला, अमित झेंडे, अमोल माने, अजय जाधव, हसन तडवी, राजू कांबळे, मनोज जाधव, धिरज महाडीक, वैभव सावंत, केतन शिंदे, चालक अमृत करपे, दलजितसिंह जगदाळे, विजय निकम, गजानन तोडकर, मोहन नाचण, राजीव कुंभार, अनिल खटावकर, प्रिती पोतेकर यांनी सहभाग घेतला. केलेल्या उत्कृष्ट कारवाईबाबत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख, श्रीमती डॉ. वैशाली कडुकर व श्री. अतुल सबनीस यांनी अभिनंदन केले.