‘सह्याद्री’त सत्ता आल्यास ऊसाला सर्वाधिक भाव अन् मोफत साखर देणार : निवासराव थोरात

0
1042
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सह्याद्री कारखान्यातील कामगार हे रिटायर झाले तरी त्यांना परमनंट केलं जात नाही हा अन्याय आता सहन केला जाणार नाही. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणुक सध्या सुरू असून या निवडणुकीत माझा उमेदवारी अर्ज बाद करून आमचं पॅनल लंगड करण्याचं काम या विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी केलं पण मी थांबलो नाही मी न्यायालयीन लढाई लढली. पॅनेलच्या माध्यमातून पूर्ण ताकतीनिशी निवडणूक लढत असून आता लढाईत थांबायच नाही तर आता जिंकायचं आहे. सह्याद्री कारखान्यात आमची सत्ता आल्यास ऊसाला सर्वाधिक भाव देऊन सभासदांना मोफत साखर देणार, अशा विश्वास स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेलचे प्रमुख उमेदवार तथा उत्तर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निवासराव थोरात (Niwasrao Thorat) यांनी व्यक्त केला.

कराड तालुक्यातील पाल येथे खंडोबा देवाच्या साक्षीने स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेलचा मोठ्या थाटात शुक्रवारी प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पॅनेलचे प्रमुख तथा कराड उत्तर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात (Niwasrao Thorat), भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम (Dhairyashil Kadam), भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, शेतकरी संघटना नेते सचिन नलावडे, भीमराव काका पाटील, संपतराव माने, संग्राम पवार, अविनाश नलवडे, पालीचे डॉ. सत्यजित काळभोर पाटील यांच्यासह सभासद, शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

यावेळी निवासराव थोरात म्हणाले की, तीस वर्षात किती जणांना तुम्ही कारखान्यात परमनंट केले आहे? यांचं उत्तर तुम्हाला आजपर्यंत देता आलेलं नाही. एक गोष्ट चांगलीच लक्षात घ्या की, सह्याद्री कारखान्यातील कामगार हे रिटायर झाले तरी त्यांना परमनंट केलं जात नाही हा अन्याय आता सहन केला जाणार नाही. ५४ वर्षात तुम्हाला कारखान्याचे विस्तारीकरण करता आला नाही. आता विस्तारित कण्याचा काम करत आहात पण त्यातही वादग्रस्त कंपनीला काम देऊन कारखाना अडचणीत आणण्याचे काम तुम्ही केले आहे.

सत्ता आल्यास हजारो स्थानिक तरुणांच्या हाती रोजगार देऊ : निवासराव थोरात

सह्याद्री कारखान्यात आमची सत्ता आल्यास पहिल्यांदा आम्ही सभासदांचा ऊस हा वेळेवर घेऊन जाऊ. कारखानाकडून सर्वाधिक भाव देऊन सभासदांना मोफत साखर देऊ, त्याचबरोबर अनेक प्रक्रिया उद्योग देखील सह्याद्री कारखान्यात सुरु करून स्थानिक तरुणांच्या हाताला काम देऊ त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊ , असा विश्वास निवासराव थोरात यांनी यावेळी दिला.

लढाईत थांबायच नसून लढाई जिंकायचीच : निवासराव थोरात

माझा उमेदवारी अर्ज बाद करून आमचं पॅनल लंगड करण्याचं काम या विद्यमान चेअरमन यांनी केलं, पण मी थांबलो नाही मला अनेक सभासदांचे फोन आले आणि त्यांनी सांगितले भाऊ, “आता थांबायचं नाही आता लढायचं हाय…तुम्ही परत कोर्टात याचिका दाखल करा आणि आम्ही सर्व शेतकरी सभासद तुमच्या सोबत आहोत,” असा विश्वास मला सभासदांनी दिला. त्यामुळे मी हे पॅनेलं पूर्ण ताकतीनिशी लढत आहोत. तसेच विरोधक इतके घाबरले की त्यांनी माझाच अर्ज बाद करून थांबले नाही तर इतर एसी आणि ओबीसी प्रवर्गातील सभासदांचा देखील अर्ज त्यांनी बाद केला आहे. त्यामुळे आता लढाईत थांबायच नाही तर आता लढाई लढाईची आणि जिंकायची देखील असल्याचा विश्वास निवासराव थोरात यांनी व्यक्त केला.

सह्याद्री कारखाना स्वतःच्या मालकीचा असल्यासारखे चेअरमन वागले : रामकृष्ण वेताळ

रामकृष्ण वेताळ म्हणाले की, ५४ वर्षांपूर्वी सहयाद्री सहकारी साखर कारखान्याची निर्मिती झाली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी सह्याद्री कारखान्याची निर्मिती केली. त्यांनी विश्वासाने हा कारखाना काही लोकांच्या हाती दिला मात्र, त्यांनी हा कारखाना आपल्या स्वतःच्या मालकीचा असल्यासारखे वागले, अशी टीका वेताळ यांनी नाव न घेता माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर केली.

कस्पटा समान असलेलं पॅनेल तुम्हाला आस्मान दाखवणारचं : धैर्यशील कदम

आमच्या पॅनेलची चिन्ह हे विमान आहे. हे आमचं कस्पटासमान असलेलं पॅनेल तुम्हाला आस्मान दाखवल्याशिवार आम्ही राहणार नाही. बापजाद्यापासून आमचा सहयाद्रीशी संघर्ष असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील काम यांनी म्हटले.

बाळासाहेब पाटलांनी सहकाराची व्याख्या सांगावी : किरण साळवी

पाल येथील प्रचार शुभारंभावेळी किरण साळवी यांनी माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर सडकून टीका केली. बाळासाहेबांच्या भाषेत सांगायचं झालं तर सहकार पिढ्यान पिढ्या एकाच घरात अगोदर आजोबा नंतर मुलगा आणि त्यांच्यानंतर नातू, संचालक यांनी एकत्रित येऊन कारखाना, संस्था त्यांच्या फायद्यासाठी चालवणे म्हणजे सहकार होय का? यालाच सहकार म्हणत असतील साठ वर्षे झाली एकाच घरात सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची सत्ता आहे. कारखाना ताब्यात असताना मग त्यावर सातशे कोटी रुपयांचे कर्ज कसे काय झाले?जे याचे उत्तर सर्वसामान्य सभासद शेतकरी बांधवाना बाळासाहेब पाटील यांनी द्यावे, अशा शब्दात किरण साळवी यांनी सडकून टीका केली.