आम्हाला एकदा संधी द्या, सह्याद्री कारखान्याला राज्यात 1 नंबर करेन – निवास थोरात

0
631
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | आम्हाला एक संधी द्या, सह्याद्री कारखान्याला एक नंबरचा दर देईन, कामगाराना चांगला पगार आणि पर्मनंट करण्यात येईल.. सभासदांना न्याय देण्यात येईल.. आम्हाला आशीर्वाद द्या असं निवास थोरात यांनी म्हंटल. सह्याद्री कारखान्याच्या सभासदांना न्याय दिला पाहिजे, आत्तापर्यंत जो चुकीचा कारभार झाला तो इथून पुढे हाणून पाडला पाहिजे हीच आपली भूमिका आहे असेही निवास थोरात यांनी म्हंटल. काल मसूर येथे स्व. यशवंतराव चव्हाण चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेलची सांगता सभा पार पडली. यावेळी निवास थोरात यांनी आपल्या भाषणात कराड उत्तरचे माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर निशाणा साधला.

निवास थोरात म्हणाले, आज सह्याद्री साखर कारखान्यात जवळपास ६ हजार वारसनोंदी प्रलंबित आहेत. सह्याद्री कारखाना उभारणीसाठी ज्यांनी कष्ट केलं, ज्यांनी या कारखान्याला मदत केली त्या मृत व्यक्तींच्या वारसाला तुम्ही नोंद करून देत नाही. मला अनेक लोक भेटली, आमचा अर्ज घेतला नाही, ३ वर्ष ऊस घालवल्याशिवाय अर्ज घेणार नाही असं आपल्याला सांगण्यात आल्याचं निवास थोरात यांनी सांगितलं. संचालक मंडळाने जाणीवपूर्वक राजकीय हेतूने सभासदांना आपल्या हक्कापासून वंचित ठेवलं आहे. कूटनीतीने तुम्ही मागील ५४ वर्षांपासून राजकारण करत आलाय, तुमच्या मनात पाप आहे, असा आरोप निवास थोरात यांनी केला.

२००२३ मध्ये सभासदानी १० किलो साखरेची मागणी केली, पण विद्यमान चेअरमन यांनी आम्ही ७ किलो साखर आणि १० रुपये प्रतिकिलो करतो… असं सांगून सभासदांच्या पोटावर पाय आणला. परंतु नंतर २०२४ च्या विधानसभेला तुमचा पराभव झाल्यानंतर तुम्ही मोफत साखर देऊ अशी घोषणा केली. तुमच्यावर वेळ आल्यावर तुम्ही फुकट साखर दिली, पण आधी सभासदांनी प्रामाणिकपणे साखर मागितली तेव्हा तुम्ही त्यांचं ऐकलं नाही. त्यामुळे आज वेळ आली आहे. विधानसभा निवडणुकीप्रमाणे आता सह्याद्री साखर कारखान्यातून सुद्धा त्यांना पायउतार करा आणि घरी बसवा असं आवाहन करत निवास थोरात यांनी बाळासाहेब पाटील यांच्यावर घणाघात केला.