सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत निवास थोरातांचे ‘विमान’ पडणार बाळासाहेब पाटलांवर भारी

0
2947
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कराड तालुक्यातील यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूकीसाठी नुकतेच चिन्ह वाटप करण्यात आले. यात सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांच्या पी. डी. पाटील पॅनेलला कपबशी, विरोधातील आमदार मनोज घोरपडे यांच्या दिवंगत यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री परिवर्तन पॅनेलला छत्री तर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवास थोरात व भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनलला विमान असे चिन्ह देण्यात आले. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य व सह्याद्रि कारखाना निवडणूकीचे उमेदवार निवास थोरात हे सर्व ताकदीनिशी स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून रिंगणात उतरले आहेत. निवास थोरात सत्ताधारी गटाच्या बाळासाहेब पाटील यांचा व पॅनलचा नक्कीच पराभव करून निवडून येतील यात शंका नाही.

सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेपासून 54 वर्षांपासून अपवाद वगळता दिवंगत पी. डी. पाटील व माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्याच गटाची सत्ता कारखान्यावर राहिली आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपने बाळासाहेब पाटलांचा दारुण पराभव करत ‘कमळ’ फुलवले. त्यामुळे आता सह्याद्री कारखाना निवडणुकीत देखील बाळासाहेब पाटील यांना व त्यांच्या पॅनलला पराभूत करण्यासाठी सर्वोतोपरी तयारी स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवास थोरात व भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ यांनी केली आहे.

बाळासाहेब पाटलांना जाब द्यावाच लागणार…

स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवास थोरात हे कारखान्याची निवडणूक लढवत आहेत. त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत माजी मंत्री तथा अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्यावर निशाणा साधला. सह्याद्री सहकारी साखर कारखाना हवा जुना साखर कारखाना असून त्याला ५४ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यातच आता कार्यक्षेत्रात सध्या अनेक कारखाने वाढले आहे. असे असताना विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी ३० वर्षात सह्याद्रीचे विस्तारीकरण केले नाही. ही त्यांची मोठी चूक असून त्याचा तोटा सभासद यांना सहन करावा लागला आहे. याचा जाब त्यांना द्यावाच लागेल. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून सह्याद्री कारखान्याची उभारणी झाली. मात्र, येथील सत्ताधाऱ्यांनी मनमानी कारभार करीत शेतकऱ्यावर अन्याय केला, अशा शब्दात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनलचे उमेदवार निवास थोरात यांनी बाळासाहेब पाटील यांच्यावर निशाणा साधला.

14 लाख मॅट्रिक टन गाळप करणारा सह्याद्रीचे यंदा 8 लाख मॅट्रिक टन गाळप

सह्याद्री सहकारी साखर कारखाना हा जुना कारखाना असून या कारखान्यास पाच तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने ऊस घालतात. शिवाय 14 हून जास्त लाख मॅट्रिक टन उसाचे गाळप हा कारखाना करतो. मात्र, यंदा फक्त 8 लाख मॅट्रिक टन गाळप कारखान्याकडून करण्यात आले आहे.

सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावर 750 कोटींचे कर्ज

सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीत सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांना विरोधकांच्या अनेक प्रश्नांना सामोरे जावं लागत आहे. आतापर्यंत निवडणूक सोडली तर कारखान्याच्या सभांमध्ये काही मोजकेच सभासद त्यांना प्रश्न विचारायचे. आता थेट कारखान्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेस तालुकाध्यक्ष निवास थोरात यांनी उमेदवारी अर्ज भरून बाळासाहेब पाटील यांच्या समोर आव्हान उभे केले आहे. अशात काल पत्रकार परिषद घेत भाजपच्या जिल्हाध्यक्ष कदमांनी महत्वाचा गौप्यस्फोट केला आहे. यशवंतराव चव्हाण यांनी उभारणी केलेल्या सह्याद्री कारखान्यावर 750 कोटींवर कर्ज करून ठेवले आहे. तो कारखाना वाचविण्यासाठी निवास थोरात यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे ठेवले असल्याचे कदम यांनी म्हंटले आहे.