पाटण तालुक्यात NDRF ची टीम दाखल; दरडग्रस्त, पूरग्रस्त गावांना दिली भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासन अर्लट झाले असून जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी यापूर्वीच आपत्ती व्यवस्थापन विभागास सतर्क राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एनडीआरएफ टीम रविवारी दाखल झाली आहे. दरम्यान, या टीमने अतिवृष्टी, भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील दरडग्रस्त व पूरग्रस्त गावांना भेटी देऊन पाहणी केली आहे.

एनडीआरएफ टीममधील जवानांनी पाटण तालुक्यात दाखल होताच संबंधित गावातील ग्रामस्थांशी चर्चा करून, संभाव्य घटनांबाबत माहिती देऊन जनजागृती केली. संभाव्य धोका टाळून काळजी घेण्याबाबत ग्रामस्थांना सूचना केल्या. पाटण तालुका अतिपर्जन्यवृष्टीचा व तालुका म्हणून ओळखला जातो. तीन वर्षांपूर्वी याच पाटण तालुक्यातील मोरगिरी, कोयनानगरसह इतर विभागांमध्ये ढगफुटी झाली होती. आंबेघर, मिरगाव, ढोकावळे आदी गावांमध्ये भूस्खलनामुळे दरडी कोसळून घरे मातीत गाडली गेली होती. तब्बल २९ जणांना जीव गमवावा लागला होता. जनावरेही मातीत गाडली गेली होती.

यावेळी घटनास्थळी पोहोचताना रस्ता ही उपलब्ध न झाल्याने लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेबरोबरच एनडीआरएफ टीमला मोठी कसरत करावी लागली होती. यावर्षीही या विभागात पावसाने मुसळधार सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर संभाव्य धोका लक्षात घेऊन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून पाटण तालुक्यात घेज एनडीआरएफची टीम पाचारण करण्यात आली. त्यानुसार पाटण तालुक्यात ही टीम नुकतीच दाखल झाली आहे.

पाटण तालुक्यातील प्रशासन पहिल्यापासूनच अलर्ट मोडवर

एनडीआरएफ टीम दाखल झाल्यानंतर तहसीलदार अनंत गुरव यांनी संबंधित टीमसोबत बैठक घेऊन त्यांना धोकादायक, दरडग्रस्त व पूरग्रस्त गावाची माहिती दिली. दरम्यान, पाटण तालुक्यातील प्रशासन पहिल्यापासूनच अलर्ट मोडवर आले आहे. संबंधित दरडग्रस्त व पूरग्रस्त गावांच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्तेही मोकळे करण्यात आले आहेत. त्यानंतर एनडीआरएफ टीमने सर्कल, मंडलाधिकरी, तलाठी यांच्याबरोबर पाटण तालुक्यातील आरल, म्हारखंड, जळव, जोतिबा, शिद्रुकवाडी, आंबेघर, काहीर, कोयनानगर यासह इतर दरडग्रस्त व पूरग्रस्त गावांमध्ये प्रत्यक्ष भेटी दिल्या. संबंधित ठिकाणी जाऊन, पाहणी करून स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा केली