कराड प्रतिनिधी | सध्या शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करून डबल पैसे मिळवून देणाऱ्या भामट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अगोदर पैसे गुंतवायला सांगायचे. पैसे गुंतवले की ते बुडाले असल्याचे सांगत फसवणूक केल्याची असे प्रकार कराड शहरात देखील घडले असताना आता दुप्पट परताव्याचे आमिष दाखवत कराडमध्ये तब्बल 10 कोटींची फसवणूक केल्याचा पर्जे पुन्हा घडला आहे. या प्रकरणी कराड येथील एका मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड शहरातील काही लोकांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणावर नफा मिळवता येतो, असे संबंधित गुंतवणूकदाराने सांगितले होते. त्याच्यात सांगण्यावरून अनेकांनी पैशाच्या मोहापायी त्यांचे पैसे गुंतवले. प्रत्यक्षात काही दिवसच ठराविक जणांना गुंतवणुकीतून थोडाफार नफा देण्यात आला. त्यानंतर नफा देण्यास टाळाटाळ झाली. मूळ रक्कम परत देण्यासही असमर्थता दाखवली.
याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुंतवणूकदारांनी लेखी तक्रार अर्ज सादर केला होता. त्यानुसार पोलिसांकडून प्राथमिक चौकशी सुरू होती. त्यातच या प्रकरणातील संशयित पोलिसांच्या हाती लागत नसल्यामुळे खरा प्रकार समोर येत नव्हता. अखेर एका संशयिताला शुक्रवारी मुंबई पोलिसांनी मुंबई येथून ताब्यात घेतले. त्यानंतर गुंतवणूकदारांनी कराड शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन याबाबतची रीतसर कायदेशीर फिर्याद दिली.