पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यात यंत्रांचा हंगाम सुरु असून येणाऱ्या लोकसभेची सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटण उपविभागीय पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अतिसंवेदनशील गावात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवला असून कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेतली जात आहे. या काळात कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पाटणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांनी काल दिला.
पाटण उपविभागीय पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या पाटण, मल्हारपेठ, मोरगिरी या ठिकाणी जिल्हाप्रमुख समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण तालुक्यातील संवेदनशील ठिकाणासह काही भागात स्ट्रायकींग फोर्ससह पोलिसांच्यावतीने संचलन करण्यात आले. यावेळी पाटण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर, मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सी. एम. मचले, सहायक फौजदार राजेंद्र अंकुशे, स्ट्रायकींग फोर्सच्या तुकडीचे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी सविता गर्जे म्हणाल्या की, सातारा जिल्ह्याला सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा यांच्या राखण्याची परंपरा लाभली आहे. जिल्ह्यात सर्वत्र शांतता राहावी यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. यावेळी वैभव पुजारी, उमेश मोरे, राजेंद्र पगडे, मचले, सुरेश चिचकर, राहुल हजारे, संतोष अंकुशे, माने, प्रतीक वचरे, आबासाहेब चे प्रमुख गलांडे, संतोष कुचेकर, मल्हारपेठ पोलीस स्टेशनचे पृथ्वीराज पाटील, प्रदीप साळवी, वाहतूक पोलीस मोरे संचलनात सहभागी झाले होते.