हिवाळी अधिवेशनात आ. बाळासाहेब पाटलांनी केली ‘ही’ महत्वाची मागणी; म्हणाले की,

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । राज्याचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरात सुरू आहे. या अधिवेशनात अनेक मुद्यांवरून सत्ताधारी व विरोधी गटात खडाजंगी होत आहे. दरम्यान, आज पार पडलेल्या कामकाजावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी महत्वाची मागणी केली. बँकामध्ये ऑनलाइन व्यवहार होत असून काही ठिकाणी हॅकर्सकडून हल्ला होण्याचे प्रकार केले जात असल्याने ते रोखण्यासाठी राज्यसरकारच्या सायबर सेलवर विशेष अस लक्ष ठेवण्यासाठी तशा प्रकारची व्यवस्था भविष्यात करता येतील का? अशी आमदार बाळासाहेब पाटील यांनी गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

नागपूरात पार पडत असलेल्या हिवाळी अधिवेशनात आ. बाळासाहेब पाटील म्हणाले की, राज्यामध्ये काही बँकामध्ये ऑनलाइन व्यवहार केले जातात, त्या बँकांवर विशेषतः हॅकर्स हल्ला करतात, त्या माध्यमातून रक्कम परदेशी पाठवली जाते, विशेष करून कोरोना काळामध्ये अश्या प्रकारची प्रकरणे घडली आहेत, त्यासाठी राज्यसरकारचे सायबर सेलवर विशेष अस लक्ष ठेऊ शकेल का, किंवा तशा प्रकारची व्यवस्था भविष्यात करता येतील का? अशी मागणी आ. पाटील यांनी केली.

आ. बाळासाहेब पाटील यांनी मागणी केल्यानंतर गृहमंत्री फडणवीस यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, आपल्या सायबर सेलची कॅपसिटी बलीदान करण्याकरिता आपण महाराष्ट्र सायबर प्रोजेक्ट हातात घेतलेला आहे. हा जो प्रोजेक्ट आहे त्यातून आपण अशी एक प्लॅटफॉर्म तयार करतोय कि यावर आपण सर्व बँन्स, फायनान्सियल इन्स्टिट्यूशनल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सर्वांचा अंगोडींग वापर करतोय. एखाद्या क्रेडिट कार्डचा फ्रॉड झाल्यास तो पैसा जर आपण तीन ते चार तासात रोखू शकलो तर चांगले होईल अन्यथा तो पैसा दिवसभरात अनेक खात्यातून ट्रान्स्फर होत विदेशात जातो. अलीकडच्या काळात अनेक लोक अशा प्रकारे नियोजन करतात कि ज्या देशाशी भारताचा समझोता नाही अशा देशातील बँक अकाउंटमध्ये पैसे ट्रान्स्फर करतात, असे प्रत्युत्तर गृहमंत्री फडणवीस यांनी दिले.