कराडात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आमदार बाळासाहेब पाटील यांच्याकडून अभिवादन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती देशभरात आज मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. कराड येथे डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते तथा कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी जयंत बेडेकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष राहुल भोसले, आनंदराव लादे, बी. एन.कालेकर सर, खोब्रागडे सर, ओमकार थोरवडे, प्रवीण लादे, प्रशांत शिंदे, अमोल सोनवणे मुबारक आतार तसेच इतर पदाधिकारी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीचे सदस्य व नागरिक उपस्थित होते.

यावेळी आमदार पाटील म्हणाले की, या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देश लोकशाही मार्गाने पुढे गेला पाहिजे यासाठी राज्यघटना तयार करण्यात आली. यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे फार मोठे योगदान आहे, २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना अंमलात आली, तेंव्हापासून आजपर्यंत विकासाची प्रक्रिया सुरू झाली, त्यामुळे सर्वसामान्य जनतेला योग्य न्याय मिळाला, या न्यायाच्या जोरावर आज देशात चांगल्या प्रकारचे काम सुरू आहे. हे घडत असताना याचा मूळ पाया डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रचला आणि त्यामाध्यमातून खऱ्या अर्थाने देशाची वाटचाल सुरू आहे. अशा या महामानवाला त्यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त विनम्र आदरांजली अर्पण करतो, त्यांचा विचार, आचार या देशाबरोबर जगाला सुद्धा न्याय देण्याचा ठरणार आहे.