कराड प्रतिनिधी । राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) आज दुसऱ्या दिवशी खा. शरद पवार गटाचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी एक महत्वाचा प्रश्न उपस्थित करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. “सहकार कायदा आणण्यामागे सरकारचा काय उद्देश आहे? असा सवाल थेट अधिवेशनात आमदार पाटील यांनी उपस्थित केला.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या पार पडत आहे. अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अनेक मुद्द्यावरून खडाजंगी होत आहे. दरम्यान, आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी खा. शरदचंद्र पवार पक्षाचे कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी एक महत्वाचा प्रश्न उपस्थित जेला. तसेच सरकारकडे एक महत्वाची विनंती देखील केली.
यावेळी आमदार पाटील म्हणाले की, ज्या संस्थेच्या चेअरमनने संस्थेच्या विश्वासपात्र राहून काम केलं, सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले तर कुणीच अविश्वास ठराव आणून त्याला बाजूला करणार नाही. दोन वर्षांचा जर कालावधी दिला तर मोठ्या प्रमाणात बेफिकरी वाढू शकते. त्यामुळे काही संस्था अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे राज्य सरकारने पुनर्विचार करून हे बिल मागे घ्यावे; अशी विनंती करत असल्याचे आमदार पाटील यांनी म्हंटले.